फोटो सौजन्य: YouTube
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सर्वसामान्यांना घाम फोडत आहे. यामुळेच अनेक जण इलेकट्रीक वाहनांना आपली पसंती दर्शवत आहे. एकीकडे ई-बाईक्स आणि कार्स लाँच होत असताना , आता देशात ई-सायकल सुद्धा लाँच झाली आहे.
ईमोटोराड (EMotorad) कंपनीने या सायकलची निर्मिती केली असून T-Rex Air असे या सायकलचे नाव आहे. ही सायकल शहरी भागात वापरण्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन मानली जात आहे. या ई-सायकलमध्ये तुम्हाला 50 किमीपेक्षाची जास्त रेंज मिळेल.
कंपनीने या इलेक्ट्रिक सायकलमध्ये 27.5 इंच चाकं दिली आहेत. ऑरेंज ब्लेझ आणि ट्रॉपिकल ग्रीन अशा दोन रंगात ही सायकल बाजारात उपलब्ध असेल. याशिवाय या इलेक्ट्रिक सायकलला हाय-टेंसिल स्टील फ्रेमसह फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क देण्यात आले आहेत. तसेच या सायकलच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. जेणेकरून सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा ही सायकल एकी चांगला ऑप्शन आहे.
या इलेक्ट्रिक सायकलच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यामध्ये 5 इंचाचा एलसीडी क्लस्टर दिला आहे, ज्याच्या मदतीने, रायडर्सना बॅटरी, वेगासह पेडल असिस्ट लेव्हल आणि ओडोमीटरची माहिती मिळेल. ही इलेक्ट्रिक सायकल 2A चार्जरसह येते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बॅटरीच्या मदतीने ही इलेक्ट्रिक सायकल 2 तास 30 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते.
या इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीने 250W ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. याशिवाय, यात 10.2AH रिमूवेबल लिथियम-आयन बॅटरी देखील देण्यात आली आहे. ही सायकल ५ लॅव्हेल पेडल असिस्टसह बाजारात उपलब्ध आहे.
एखाद वेळीस या सायकलमधील बॅटरी डिस्चार्ज होते, तर तुम्ही ती गिअर असलेली सायकल म्हणून देखील वापरू शकता. या इलेक्ट्रिक सायकलला ताशी 25 किमीचा टॉप स्पीडही देण्यात आला आहे.
ईमोटोरॅडची ही इलेक्ट्रिक सायकल 34,999 रुपयांच्या किमतीत लाँच केली आहे. ही सायकल बॅटरी आणि गिअर या दोन्ही पर्यायांवर चालते.