Toyota ने सादर केली Driverless Electric Vehicle, किंमत तर डायरेक्ट कोटींमध्येच
भारतासह जगभरात Toyota ने आपल्या वाहनांमुळे मोठे नाव कमावले आहे. नुकतेच कंपनीने एक नवीन इलेक्ट्रिक वाहन लाँच केले आहे. आश्र्चर्य म्हणजे कंपनीचे हे वाहन ड्रायव्हरशिवाय चालवले जाऊ शकते. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत सध्या नवीन लाँचिंगचा हंगामच सुरू आहे. याच मालिकेत टोयोटा (Toyota) कंपनीने e-Palette नावाची एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक शटल सादर केली आहे. या शटलची किंमत 29 मिलियन येन म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 1.74 कोटी ठेवण्यात आली आहे. सध्या या मॉडेलमध्ये लेवल 2 ऑटोमेटेड ड्रायव्हिंग सिस्टम देण्यात आलेली आहे. मात्र कंपनी यापेक्षाही अधिक प्रगत तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामुळे भविष्यात ही गाडी पूर्णपणे स्वयंचलित (driverless) होऊ शकेल.
‘या’ तीन चाकांच्या Electric Scooter ची ग्राहकांमध्ये जोरदार चर्चा, जाणून घ्या किंमत
ही शटल पूर्णपणे बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल (BEV) आहे. ती स्मार्ट सिटी ट्रान्सपोर्ट, शटल सेवा, तसेच मल्टी-फंक्शनल मोबिलिटीसाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. ही गाडी Mobility as a Service (MaaS) या टोयोटाच्या भविष्यातील व्हिजनचा एक भाग आहे. येत्या काही वर्षांत यात ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात येणार आहे.
टोयोटा e-Palette ही एक Purpose-Built Vehicle (PBV) आहे. या शटलमध्ये शक्तिशाली लिथियम-आयन बॅटरी (72.8 kWh) देण्यात आली आहे, जी एका चार्जमध्ये सुमारे 250 किलोमीटर पर्यंत चालू शकते. याची टॉप स्पीड 80 किमी/तास आहे, त्यामुळे ती शहरी भागातील आणि गर्दीच्या रस्त्यांवरील वाहतुकीसाठी अगदी योग्य आहे. या इलेक्ट्रिक शटलमध्ये एकावेळी 17 प्रवासी आरामात प्रवास करू शकतात.
टोयोटाने e-Palette ला अत्याधुनिक सेन्सर, ऑटो ड्रायव्हिंग सिस्टीम आणि डिजिटल इंटिग्रेशनसह सुसज्ज केले आहे. सध्या ड्रायव्हरची उपस्थिती आवश्यक असली तरी, भविष्यात ही गाडी पूर्णपणे ऑटोमॅटिक होऊ शकते. ही गाडी सध्या जपानमध्ये उपलब्ध असून, लवकरच ती इतर देशांतही सादर करण्यात येईल.
‘या’ SUV च्या मागे ग्राहक हात धुवून लागलेत! फक्त 30 दिवसात विकल्या 32000 युनिट्स, किंमत…
पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करून, पर्यावरणपूरक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या दिशेने टोयोटाचे हे आणखी एक पाऊल आहे. e-Palette ही शहरी ट्रान्सपोर्टसाठी एक स्मार्ट, टिकाऊ आणि फ्यूचर-रेडी सोल्यूशन ठरते.