फोटो सौजन्य: Social Media
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये अनेक उत्तम वाहनं लाँच झाली आहेत. आता हिरो मोटोकॉर्प या दुचाकी उत्पादक कंपनीने आपल्या प्रीमियम बाईक आणि स्कूटर लाँच केल्या आहेत.
हिरो मोटोकॉर्प, जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल्स आणि स्कूटर उत्पादक कंपन्यांपैकी एक, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये नवीन उत्पादनांची आणि तंत्रज्ञानाची एक श्रेणी सादर केली. या प्रदर्शनीत हिरो मोटोकॉर्पने भारताला जागतिक इनोव्हेशन केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याची, आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याची आणि जागतिक दर्जाच्या मोबिलिटी उपाययोजना देण्याची वचनबद्धता दर्शवली.
‘लिव्ह लाइफ, लिवो स्टाइल’ म्हणत होंडाने लाँच केली New 2025 Livo, किंमत 1 लाखांपेक्षाही कमी
एक्स्ट्रीम २५०आर आणि एक्सपल्स २१० यासह हिरोने २५० सीसी बाईक विभागात दमदार प्रवेश केला. एक्सट्रीम २५०आर मध्ये २५० सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. तसेच या बाईक सर्वात गतीशील बाईक्स आहे. एक्सपल्स २१० मध्ये शक्तिशाली २१० सीसी इंजिन आहे, ज्यामुळे साहसी राइडिंगचा अनुभव मिळतो.
झूम १२५ आणि झूम १६० स्कूटर पोर्टफोलिओमध्ये नवीन फीचर्स जोडले आहे. झूम १६० मध्ये १५६ सीसी इंजिन आहे, जे प्रीमियम स्कूटर श्रेणीमध्ये नवीन मापदंड स्थापित करते. झूम १२५ उच्च कार्यक्षमता आणि आकर्षक डिझाइनसह लाँच करण्यात आले.
एचएफ डिलक्स – फ्लेक्स फ्युएल मोटरसायकल: हिरोने भारत सरकारच्या हरित तंत्रज्ञानास प्रतिसाद देत इथेनॉलवर चालणारी आपली पहिली फ्लेक्स फ्युएल मोटरसायकल लाँच केली आहे.
व्हिडा व्ही-२: कंपनीने व्हिडा व्ही-२ ई-स्कूटरचे प्रदर्शन केले. ९६,००० रुपये किंमतीतील हे ई-स्कूटर रिमूव्हेबल बॅटरी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे १६५ किमीपर्यंत रेंज देतो.
हिरो मोटोकॉर्पने प्रीमियम पोर्टफोलिओला अधिक ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी “हिरो प्रीमिया” डीलरशिप्स सुरू केली आहेत. देशभरात ६० पेक्षा जास्त हिरो प्रीमिया डीलरशिप्स स्थापित करण्यात आले आहेत, आणि येत्या महिन्यांत त्यांची संख्या १०० पर्यंत पोहोचेल. या डीलरशिप्समध्ये व्हिडा आणि हार्ले डेव्हिडसन यांसारख्या प्रीमियम ब्रँड्ससाठी विशेष विभाग आहेत, ज्यामुळे ग्राहकांना एक उत्कृष्ट रिटेल अनुभव मिळतो.
हिरो मोटोकॉर्पच्या सर्ज एस३२ सारख्या नाविन्यपूर्ण वाहनांची सादरीकरणेही दर्शवण्यात आली. हे वाहन क्लास कन्वर्टिबल वाहन असून, याला विविध प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. याव्यतिरिक्त, हिरोने २०२५ करिझ्मा एक्सएमआर २०१ कॉम्बॅट एडिशन, मॅव्हरिक ४४प्रो यासारखी उत्कृष्ट गाड्यांचीही प्रदर्शनी ठेवली.
एक्स्ट्रीम २५०आर (Xtreme 250R): ₹१,७९,९००/-
एक्सपल्स २१० (Xpulse 210): ₹१,७५,८००/-
झूम १६० (Xoom 160): ₹१,४८,५००/-
झूम १२५ (Xoom 125): ₹८६,९००/-
या बाईक्सच्या बुकिंग फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होतील, आणि डिलिव्हरी मार्च २०२५ पासून सुरू होईल.