'लिव्ह लाइफ, लिवो स्टाइल' म्हणत होंडाने लाँच केली New 2025 Livo, किंमत 1 लाखांपेक्षाही कमी
देशात बाईक्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या देशात अनेक उत्तम बाईक्स लाँच करत आहे. आजही ग्राहक नवीन बाईक खरेदी करताना एका गोष्टीवर विशेष लक्ष देताना दिसतात. ती गोष्ट म्हणजे बाईकची किंमत.
आज भारतीय मार्केटमध्ये अशा अनेक बाईक्स आहेत, ज्यांची किंमत 1 लाखांपेक्षा कमी आहे. आता देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने देखील एक नवीन बाईक मार्केटमध्ये आणली आहे. चला या बाईकबद्दल जाणून घेऊया.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ने नवीन ओबीडी२बी प्रमाणित लिवो लाँच केली आहे. शहरातील तरूण प्रवाशांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या नवीन लिवोमध्ये आकर्षक डिझाइनसह अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे राइडिंग अनुभव अधिक चांगले करते. 2025 होंडा लिवोची किंमत एक लाखानपेक्षा कमी आहे, ज्यामुळे ही बाईक नक्कीच सर्वसामान्यांना परवडणारी असणार आहे.
हीच ती सुवर्ण संधी ! जानेवारी 2025 पर्यंत Honda Amaze मिळत आहे ‘या’ इंट्रोडक्टरी किंमतीत
२०२५ लिवोच्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. होंडामध्ये आम्ही प्रवासी मोटरसायकल सेगमेंटमध्ये नवीन मापदंड स्थापित करण्याप्रती कटिबद्ध आहोत. २०२५ लिवोमधून ग्राहकांना मोटरसायकलची आकर्षक स्टायलिंग व नवीन वैशिष्ट्यांसह ११० सीसी श्रेणीमध्ये प्रीमियम अनुभव देण्याप्रती आमची समर्पितता दिसून येते. आम्हाला विश्वास आहे की, नवीन लिवो भारतातील राइडर्सच्या वैविध्यपूर्ण गरजांची पूर्तता करेल.”
स्पोर्टी डिझाइन करण्यात आलेल्या अपडेटेड लिवोमध्ये सर्वोत्तम घटकांची भर करण्यात आली आहे, जसे शक्तिशाली फ्यूएल टँकसह आकर्षक टँक श्रॉड्स आणि बॉडी पॅनेल्सवर लक्षवेधक ग्राफिक्स. ही बाईक ड्रम व डिस्क या दोन व्हेरियंट्स तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. पर्ल इग्निअस ब्लॅकसह ऑरेंज स्ट्रिप्स, पर्ल इग्निअस ब्लॅकसह ब्ल्यू स्ट्रिप्स आणि पर्ल सायरेन ब्ल्यू, असे हे तीन रंग असणार आहे.
नवीन लिवोमध्ये आता फुली डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आहे, ज्यामधून बरीच माहिती मिळते, जसे रिअल-टाइम मायलेज, डिस्टन्स टू एम्प्टी, सर्विस ड्यू इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर आणि इको इंडिकेटर. सुरक्षिततेमध्ये अधिक भर करत या प्रवासी बाईकमध्ये साइड स्टॅण्ड इंजिन कट ऑफ फीचर्स कायम ठेवण्यात आले आहे.
आईशपथ एवढी जास्त किंमत ! Auto Expo 2025 मध्ये नवीन BMW X3 लाँच
लिवोमध्ये १०९.५१ सीसी, सिंगल-सिलिंडर, फ्यूएल-इंजेक्टेड इंजिनची शक्ती आहे, जे आता आगामी सरकारी नियमनांची पूर्तता करण्यासाठी ओबीडी२बी प्रमाणित आहे. हे इंजिन ७५०० आरपीएममध्ये ६.४७ केडब्ल्यू शक्ती आणि ५५०० आरपीएममध्ये ९.३० एनएम सर्वोच्च टॉर्कची निर्मिती करते, तसेच ४-स्पीड गिअरबॉक्स आहे.
नवीन २०२५ होंडा लिवोची किंमत Rs. 83,080 रूपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते. या बाईकचे दोन व्हेरियंट मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. ड्रम व्हेरियंटची किंमत Rs. 83,080 असणार आहे, तर डिस्क व्हेरियंटची किंमत Rs. 85,878 असणार आहे. ही मोटरसायकल लवकरच भारतभरातील एचएमएसआय डिलरशिप्समध्ये उपलब्ध असेल.