फोटो सौजन्य: iStock
देशभरात अनेक बाईक्स लाँच होत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक बाईकचा देखील समावेश आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज नवनवीन वाहन लाँच करत आहे. नुकतेच जपानी दुचाकी उत्पादक कंपनीने आपली नवीन भारतात लाँच केली आहे.
ही नवीन बाईक कोणत्या सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे? त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स दिली आहेत? बाईकमध्ये किती शक्तिशाली इंजिन आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊया.
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने भारतीय बाजारपेठेत नवीन बाईक लाँच केली आहे. Honda CB300F ही नवीन बाईक कंपनीने आणली आहे. ही बाईक 300 सीसी सेगमेंटमध्ये आणली गेली आहे.
Honda CB300F बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती फ्लेक्स फ्युएलवर चालवली जाते. 85 टक्के फ्लेक्स इंधनासह ही बाईक सहज चालवता येते. यामुळे 85 टक्के फ्लेक्स इंधन आणि 15 टक्के पेट्रोलवर चालणारी ही देशातील पहिली बाईक ठरली आहे.
ही बाईक कंपनीने 300 सीसी सेगमेंटमध्ये लाँच केली आहे. हे ऑइल कूल्ड फोर स्ट्रोक, 293.92 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिनसह येते. यामुळे 18.3 किलोवॅटची पॉवर आणि 25.9 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. ही बाईक सिक्स स्पीड गिअरबॉक्ससह आणण्यात आली आहे. ज्यासोबत असिस्ट स्लिपर क्लच देखील देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: ‘या’ बाईकचा नादच खुळा, किंमत एवढी महाग की मुंबईत विकत घ्याल 1BHK फ्लॅट
देशातील पहिल्या E85 फ्लेक्स फ्युएल रनिंग बाईकमध्ये होंडाने अनेक चांगले फीचर्स दिले आहेत. यात पुढील आणि मागील चाकांवर डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनल एबीएस, निवडण्यायोग्य टॉर्क नियंत्रण, सोनेरी रंगाचे USD फॉर्क्स, 5-स्टेप ॲडजस्टेबल रिअर मोनो शॉक सस्पेंशन, एलईडी लाईट्स, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंटेलिजेंट इथेनॉल इंडिकेटर यांसारखी फीचर्स आहेत.
Honda ने आपली नवीन बाईक Honda CB 300F फक्त एकाच व्हेरियंट लाँच केली आहे. हे स्पोर्ट्स रेड आणि मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक कलरच्या पर्यायांसह आणले गेले आहे. ही बाईक 1.70 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत आणली आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बाईक ऑक्टोबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यापासून होंडा बिग विंग डीलरशिपद्वारे उपलब्ध केली जाईल.