तरुण पोहण्यासाठी गेले तेव्हा…
पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख समोर आली असून ते वाघदरी-इसासनी परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास काही तरुण अंबाझरी तलावात पोहण्यासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी पाण्यात एक मृतदेह तरंगतांना दिसला. त्या तरुणांनी तातडीने अंबाझरी पोलिसांना याची माहिती दिली.
विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचेल. त्यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला. हा मृतदेह कोणाचा याचा तपास सुरु केली असता त्यानं मृतदेहाजवळ ओळखपत्र सापडलं आणि त्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर, पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आला.
मानसिक तणावात
मागील दोन वर्षांपासून शिलरत्न यांचे त्यांच्या पत्नीसोबत सतत वाद सुरू होते. याच कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी आपल्या माहेरी राहत होती आणि शिलरत्न त्यांच्या दोन मुलांसह इसासनी येथील त्यांच्या घरी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांचा ताबा मागितल्यामुळे ते मानसिक तणावात होते.
शिलरत्न बेलेकर यांची काही महिन्यांपूर्वी हिंगणा पोलीस ठाण्यातून प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली होती. १९ फेब्रुवारीपासून शिलरत्न त्यांच्या भावाने 22 फेब्रुवारी रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह अंबाझरी तलावात तरंगताना आढळला.
प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी
प्रेससीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या केली, तर इतर ४ जण गंभीर जखमी आहेत. ही थरारक घटना कळमना ठाण्यांतर्गत पार्वतीनगरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तरुणांमध्ये वाढते दारूचे व्यसन आणि त्यातून घडत्त असलेल्या हिंसाचारावर प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांनी या हत्याकांडात ५ जणांना अटक केली तर अल्पवयीनला ताब्यात घेतले, ऋतिक सावनलाल पटले (२२) रा. पार्वतीनगर, आजरी-माजरी असे मृताचे नाव आहे. अटकेतील आरोपींमध्ये ईशा हातिम अंसारी (५५), त्याची मुले मुस्तफा उर्फ गोलू अंसारी (२८), लुकमान अंसारी (२२), साहिल अंसारी (२०), सलाउद्दिन अंसारी (१९) आणि एका अल्पवयीनचा समावेश आहे. जखमी तनसू शिवप्रसाद नागपुरे (२३), सलीम अंसारी, संगीता नागपुरे आणि शिवप्रसाद नागपुरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: 19 फेब्रुवारीपासून ड्युटीवर गैरहजर होते; 22 फेब्रुवारीला तक्रार दाखल.
Ans: तलावात तरंगताना काही तरुणांना दिसला.
Ans: मृत्यूमागील कारण काय?






