फोटो सौजन्य: iStock
सध्या देशभरात इलेक्ट्रिक कार्सचे वारे जोरदार वेगाने वाहत आहे. येणारा काळ हा इलेक्ट्रिक कार्सचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करीत आहे. ग्राहक सुद्धा वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींना कंटाळल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे आपला मोर्चा फिरवीत आहे. पण इलेक्ट्रिक कार्सचा पर्याय म्हणून सीएनजी कार्सकडे पाहिले जाते.
आजही सीएनजी कार्सची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे. एवढेच काय, आत तर मार्केटमध्ये सीएनजी बाईकसुद्धा आलाय आहेत. पण कार सीएनजी असो की इलेक्ट्रिक, हल्ली त्यांना आग लागण्याचा घटना सुद्धा वाढल्या आहे. सोशल मीडियावर आपण असे अनेक व्हिडिओज बघतो ज्यात इलेक्ट्रिक किंवा सीएनजी कार अचानक पेट घेते.
हे देखील वाचा: जेट प्लेनचे इंजिन किती CC चे असते? मायलेज ऐकाल तर उडूनच जाल
कार सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) असो किंवा ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल), कारची योग्य काळजी न घेतल्यास कोणत्याही कारला आग लागण्याचा धोका वाढू शकतो. सीएनजी आणि इलेक्ट्रिक दोन्ही कार्सना वेगवेगळ्या कारणांमुळे आग लागण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडेही सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कार असेल किंवा तुम्ही ती खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आधी हे समजून घ्यावे लागेल की या कार्सना आग लागण्याचे नेमके कारण काय?
गॅस गळती : सीएनजी कारमध्ये बसवलेल्या सिलेंडर किंवा पाईपमधून गॅस गळती होऊ शकते, असे झाल्यास चुकून कुठेतरी ठिणगी पडली तर कारला आग लागू शकते.
चुकीचे इन्स्टॉलेशन: काही लोक नवीन कार खरेदी करताना पैसे वाचवण्यासाठी स्थानिक बाजारातून सीएनजी किट बसवून घेतात, परंतु जर किट व्यवस्थित बसवले नाही तर ते कारला आग लागण्याचे कारण बनू शकते.
मेंटेनन्सचा अभाव : सर्व्हिसिंग योग्य वेळी करून घेणे महत्त्वाचे आहे, एवढेच नाही तर दर तीन वर्षांनी हायड्रो टेस्टिंग होणे आवश्यक आहे. या टेस्टिंगमध्ये सीएनजी सिलिंडर किती सुरक्षित आहे याची टेस्टिंग केली जाते, पैसे वाचवण्यासाठी हायड्रो टेस्टिंग न केल्यास व सीएनजी सिलिंडरमध्ये काही समस्या आल्यास आग लागू शकते.
बॅटरी: कंपन्या इलेक्ट्रिक कार्समध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरतात, जर बॅटरीमध्ये कोणतेही उत्पादन दोष असेल किंवा बॅटरी जास्त गरम झाली किंवा खराब झाली तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते.
चार्जिंग: तुमच्या इलेक्ट्रिक कारच्या चार्जरमध्ये किंवा चार्जिंग पोर्टमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असल्यास शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते.
दोन्ही वाहनांना आग लागण्याची कारणे वेगवेगळी असल्याने सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कोणत्या वाहनाला अधिक आग लागण्याची शक्यता आहे हे सांगणे कठीण आहे. आगीचा धोका टाळायचा असेल तर कारमध्ये काही बिघाड झाला तर लगेच दुरुस्त करा.