फोटो सौजन्य: @TheANI_Official (X.com)
ह्युंदाई कंपनी देशात अनेक चांगल्या कार ऑफर करत आहे. नुकतेच कंपनीने Hyundai Aura चे Corporate Edition लाँच केले आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
देशात कारच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वाहनांना मिळणारी मागणी पाहता अनेक कार उत्पादक कंपन्या नवनवीन कार भारतीय मार्केटमध्ये सादर करत आहे. नुकतेच ह्युंदाई कंपनीने एक नवीन कॉर्पोरेट एडिशन कार लाँच केली आहे.
Maruti Grand Vitara खरेदी करण्यासाठी किती करावे Down Payment, किती असेल EMI?
साऊथ कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई देशात अनेक वर्षांपासून विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनी नवनवीन फीचर्ससह आकर्षक कार मार्केटमध्ये आणत आहे. आता कंपनीने Hyundai Aura चे कॉर्पोरेट एडिशन लाँच केले आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये ह्युंदाई ऑरा ऑफर करते. या सेगमेंटमध्ये देण्यात येणारी ह्युंदाई ऑरा कॉर्पोरेट एडिशनसह लाँच करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवासादरम्यानचा अनुभव अधिक चांगला होईल.
ऑराच्या नवीन एडिशनमध्ये कंपनीकडून अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यात 6.75 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले ऑडिओ आहे. यासोबतच, 15 इंच टायर्ससह ड्युअल टोन स्टाईल स्टील व्हील्स, एलईडी डीआरएल, रियर विंग स्पॉयलर, टीपीएमएस, रियर एसी व्हेंट, कप होल्डरसह रियर सेंटर आर्मरेस्ट देण्यात आले आहेत. कारला कॉर्पोरेट बॅजिंग देखील देण्यात आले आहे.
MG Astor चा ‘हा’ व्हेरियंट भारतीय मार्केटमधून गायब, कंपनीने थांबवली विक्री
सेडान कार कॉर्पोरेट एडिशनसह लाँच करण्यात आली आहे. पण त्याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे 1.2 लिटर इंजिनने सुसज्ज आहे जे 83 पीएस पॉवर आणि 113.8 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. पेट्रोलसोबतच, त्यात सीएनजी इंजिनचा पर्याय देखील आहे, ज्यामध्ये 1.2 लिटर इंजिन 69 पीएसची पॉवर आणि 95.2 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. ह्युंदाई ऑरा कॉर्पोरेट एडिशनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि स्मार्ट ऑटो एएमटी ट्रान्समिशन पर्याय देखील आहेत.
ह्युंदाईने पेट्रोल आणि सीएनजी इंजिन दोन्ही पर्यायांसह ऑराचे कॉर्पोरेट एडिशन लाँच केले आहे. सेडान कारच्या कॉर्पोरेट एडिशनच्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7.48 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचे व्हर्जन 8.47 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.
ह्युंदाई ऑरा ही कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये आणली गेली आहे. या विभागात, ती मारुती डिझायर, टाटा टिगोर आणि होंडा अमेझ सारख्या कारशी थेट स्पर्धा करते.