फोटो सौजन्य: iStock
हिवाळ्याचे दिवस चालू झाले आहे. या गुलाबी थंडीच्या मोसमात अनेक जण माळशेज घाट, महाबळेश्वर, माथेरान अशा थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे प्लॅन बनवत असतात. त्यातही जर तुमच्याकडे स्वतःची कार असेल तर लॉंग ड्राईव्ह करण्यास कार चालकाला सुद्धा एक वेगळीच मजा येत असते.
सध्या भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक कार्स लाँच होत आहे. यात इलेक्ट्रिक कार्सची संख्या चांगली आहे. येणारा काळ हा इलेक्ट्रिक कार्सचाच असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज ज्या आधी फक्त इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करीत होते, तेच आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर सुद्धा भर देत आहे.
अखेर Honda Amaze 2024 भारतात झाली लाँच, मिळणार दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत
इलेक्ट्रिक वाहने जसजशी लोकप्रिय होत चालले आहेत, तसतसे त्यांच्यासोबत लांब पल्ल्याच्या प्रवासही शक्य होत आहेत. वेगवान चार्जिंग स्टेशन्सच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ हे त्यामागचे कारण आहे. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की इलेक्ट्रिक कारमध्ये लॉंग ड्राईव्हला जाण्यापूर्वी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. यासोबत इलेक्ट्रिक कारमध्ये कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत हे देखील जाणून घेऊया.
इलेक्ट्रिक कारमध्ये लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी बॅटरीची क्षमता तपासा. बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे का हे तपासणे गरजेचे आहे.
इलेक्ट्रिक कार सामान्यत: त्यांच्या चार्जिंगच्या शेवटी सेल ऑटोमॅटिक संतुलित करते. हे लक्षात घेऊन, तुम्ही तुमच्या कारला 100 टक्के चार्ज करावे, यामुळे सेल आपोआप संतुलित होईल. हे बॅटरी पॅक आणि सेलची कार्यक्षमता आणि दीर्घायुष्य राखते.
इलेक्ट्रिक कारने लॉंग ड्राईव्हवर निघण्यापूर्वी टायर्सची स्थिती निश्चितपणे तपासा. रस्त्यावर पकड कायम ठेवण्यासाठी कारचे टायर चांगले राहणे आवश्यक आहे. विशेषत: ओल्या किंवा निसरड्या रस्त्यांवर. त्यामुळे मोठ्या प्रवासाला निघण्यापूर्वी टायरची क्वालिटी नक्की तपासा. यासोबतच टायरचा प्रेशर चांगला ठेवा.
इलेक्ट्रिक कारसोबत लॉंग ट्रिप प्लॅन करण्यापूर्वी, ब्रेक पॅड निश्चितपणे तपासा. अचानक ब्रेक फेल होऊ नये म्हणून पुरेशा ब्रेक पॅडची खात्री करा. ब्रेक फ्लुइडची पातळी तपासा आणि त्याची गुणवत्ता राखा. त्याच वेळी, त्याच्या रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमची कार्यक्षमता देखील तपासा. हे एनर्जी वाचवण्यास मदत करते. हे उतारावर जाताना आणि ब्रेक लावताना बॅटरी रिचार्ज करण्यास देखील मदत करते. जेव्हा बॅटरी 80 टक्के कमी होते तेव्हा ते कार्य करते.
इलेक्ट्रिक कारमध्ये लांबचा प्रवास करण्यापूर्वी, त्याची मोटर आणि बॅटरी कूलिंग सिस्टम नीट तपासून घ्या. कूलरचा उद्देश बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर जास्त गरम होणार नाही याची खात्री करणे हा आहे.
तुम्ही तुमची इलेक्ट्रिक कार लॉंग राइडवर घेऊन जात असाल तेव्हा त्याची चार्जिंग केबल आणि चार्जिंग पोर्ट नक्की तपासा. कोणतेही नुकसान, गंज किंवा सैल कनेक्शनसाठी कारचे चार्जिंग पोर्ट तपासणे गरजेचे आहे. ते व्यवस्थित काम करत आहे की नाही, याची खात्री करून घ्या.