फोटो सौजन्य: iStock
जर तुम्ही रॉयल एनफील्डची बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल पण बजेट कमी असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. रॉयल एनफील्डची हंटर 350 बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. ही ब्रँडची सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय बाईक आहे, जी विशेषतः तरुण रायडर्सकडून पसंत केली जाते.
Royal Enfield Hunter 350 फक्त 20,000 रुपयांच्या डाउन पेमेंटसह तुम्ही घरी कशी आणू शकता, याचा ईएमआय किती असेल, मायलेज किती आहे आणि त्यात कोणते खास फीचर्स उपलब्ध आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या बेस व्हेरियंटची राजधानी दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत सुमारे 1.73 लाख रुपये आहे. या रक्कमेत 1.50 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत, 12000 रुपये आरटीओ शुल्क, 10000 रुपयांचा विमा आणि 9000 रुपये आणि इतर खर्च समाविष्ट आहेत. ग्राहक ही एकूण रक्कम डाउन पेमेंट आणि ईएमआय पर्यायांद्वारे सोप्या हप्त्यांमध्ये देऊ शकतात.
Tata Nano चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच होणार? सोशल मीडियावर रंगली चर्चा
जर तुम्ही 20,000 चे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला उर्वरित रक्कमेसाठी म्हणजेच 1.53 लाख रुपये कर्ज घ्यावे लागेल. समजा बँक तुम्हाला 9% वार्षिक व्याजदराने 3 वर्षांचे कर्ज देते, तर तुमचा महिन्याचा EMI सुमारे 5,100 असेल. या लोनच्या कालावधीत तुम्हाला सुमारे 30000 व्याज देखील द्यावा लागेल. म्हणजेच, बाईकची एकूण किंमत (डाउन पेमेंट + EMI + व्याज) सुमारे 2 लाख रुपये असेल. व्याजदर आणि EMI तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आणि बँकेच्या पॉलिसीवर अवलंबून असतात.
रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 349cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड आणि फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 20.4 पीएस पॉवर आणि 27 Nm टॉर्क देते. या बाईकला 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. हे मॉडेल शहरातील वाहतूक आणि महामार्ग दोन्ही ठिकाणी सुरळीत आणि मजबूत परफॉर्मन्स करण्यास सक्षम आहे.
रॉयल एनफील्ड हंटर 350 चे मायलेज ARAI कडून प्रमाणित केलेल्या 36 किमी प्रति लिटर आहे. यात 13-लिटर फ्युएल टॅंक आहे. एकदा हा टॅंक भरला की ही बाईक 450 किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते. जर एखाद्या व्यक्तीने दररोज 30 ते 35 किमी बाईक चालवली तर त्याला सुमारे 12 ते 15 दिवस पुन्हा पेट्रोल भरण्याची आवश्यकता भासणार नाही.
मागील 12 महिन्यात ग्राहकांवर ‘या’ बाईकने केली जादू ! Activa, Shine आणि Pulsar ला टाकले मागे
हंटर 350 मध्ये क्लासिक लूकसह अनेक आधुनिक फीचर्स आहेत. त्यात ॲनालॉग-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ड्युअल-चॅनल एबीएस सारख्या फीचर्सचा समावेश आहे.