फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात अनेक उत्तम कार्स आहेत, ज्यांना खरेदी करण्यासाठी नेहमीच ग्राहक रांगा लावत असतात. यात काही जणांना बजेट फ्रेंडली कार्स आवडतात तर काही जण महागड्या कार्स घेण्यास सुद्धा प्राधान्य देत असतात. आपल्याकडे कार घेणे हा एक फक्त चांगला क्षण नसून एक सोहळा असतो. अनेकांचे स्वप्न असते की आपली स्वतःची कार असावी. आज हेच स्वप्न कार लोनमुळे पूर्ण होताना दिसत आहे.
मार्केटमध्ये स्कोडा कंपनीची स्लाव्हियाला चांगलीच मागणी मिळताना दिसत आहे. भारतीय बाजारपेठेत, स्लाव्हियाला Skoda ने मिड साइज सेडान कार सेगमेंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. क्लासिक हे त्याचे बेस व्हेरियंट म्हणून कंपनीने ऑफर केले आहे. जर तुम्ही या सेडान कारचे बेस व्हेरियंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट करून ही कार घरी आणू इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागू शकतो, ते आपण या बातमीत जाणून घेणार आहोत. पण त्याआधी या कारच्या बेस व्हेरियंटची किंमत जाणून घेऊया.
SteelBird कडून Vintage Series Helmet लाँच, मिळणार अधिकची सुरक्षितता, किंमत फक्त…
स्लाव्हियाचा बेस व्हेरियंट क्लासिक स्कोडाने भारतीय मार्केटमध्ये 10.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत ऑफर केला आहे. ही कार राजधानी दिल्लीत खरेदी केल्यास सुमारे 1.13 लाख रुपये रोड टॅक्स, 34 हजार रुपयांचा विमा आणि 10700 रुपये टीसीएस चार्ज भरावा लागेल. त्यानंतर स्कोडा स्लाव्हिया क्लासिक ऑन रोडची किंमत 12.27 लाख रुपये आहे.
तुम्ही या कारचा बेस व्हेरियंट क्लासिक विकत घेतल्यास, बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केले जाईल. अशा परिस्थितीत, 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 10.27 लाख रुपये वित्तपुरवठा करावे लागेल. जर बँकेने तुम्हाला सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजासह 10.27 लाख रुपये दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 16527 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
मार्केटमध्ये नवीन E Scooter लाँच, फक्त 999 होईल बुकिंग, 1 KM चालवण्याचा खर्च फक्त 17 पैसे
जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 10.27 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 16527 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, तुम्ही स्कोडा स्लाव्हिया क्लासिकसाठी सात वर्षांत सुमारे 3.61 लाख रुपये व्याज द्याल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 15.88 लाख रुपये असेल.
स्कोडा स्लाव्हिया भारतीय मार्केटमध्ये मिड साइज सेडान कार सेगमेंटमध्ये ऑफर करण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये ही कार मारुती सियाझ, ह्युंदाई व्हर्ना, फोक्सवॅगन व्हरटस, होंडा सिटी यांसारख्या कारशी थेट स्पर्धा करते.