फोटो सौजन्य - Social Media
भारतातील आध्यात्मिक पर्यटनामध्ये अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत मेकमायट्रिपच्या एकूण रूम नाईट बुकिंगपैकी 10 टक्क्यांहून अधिक वाटा तीर्थस्थळांचा असल्याचे दिसून आले आहे. 2022 च्या तुलनेत 2024 मध्ये या प्लॅटफॉर्मवर आध्यात्मिक स्थळांच्या शोधांमध्ये 46 टक्क्यांनी वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये आध्यात्मिक अनुभवासाठी वाढती आवड स्पष्ट होते. याच पार्श्वभूमीवर मेक माय ट्रिपने यात्रेकरूंना योग्य निवास शोधण्यात मदत करण्यासाठी ‘लव्ड बाय डेवोटीज’ नावाचा विशेष उपक्रम सादर केला आहे. या अंतर्गत भारतातील 26 प्रमुख तीर्थस्थळांवर 450 हून अधिक निवडक हॉटेल्स आणि होमस्टे प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
या विकासाबाबत बोलताना हॉटेल, ग्रोथ आणि इमर्जिंग बिझनेसेस चे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर अंकित खन्ना म्हणाले, “चांगल्या रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्कामुळे भारतातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. ‘लव्ड बाय डेवोटीज’ याची खात्री देते की प्रवाशांना त्यांच्या विशिष्ट गरजांसाठी योग्य सुविधा असलेला निवास मिळेल. खऱ्या प्रवाशांच्या अभिप्रायांवर आधारित आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केलेल्या या उपक्रमामुळे आध्यात्मिक प्रवाशांना योग्य निवास पर्याय निवडण्यात मदत होते. आमचे ध्येय साधे आहे, यात्रेच्या नियोजनाचा ताण कमी करून भक्तांना त्यांच्या श्रद्धा आणि अनुभवावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करणे.”
‘लव्ड बाय डेवोटीज’मध्ये प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन सहा प्रमुख निकषांवर आधारित निवास स्थानांचे मूल्यांकन केले जाते. त्यामध्ये पूजास्थळांच्या जवळीक, प्रवास केंद्रांपासून सहज पोहोच, शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट्सची उपलब्धता, पार्किंग सुविधा, प्रवास सहाय्य डेस्क आणि वृद्धांसाठी अनुकूल सेवा जसे की व्हीलचेअर सहाय्य, डॉक्टर ऑन-कॉल आणि प्राथमिक उपचार किटचा समावेश आहे. फक्त 3.5 किंवा त्याहून अधिक यूजर रेटिंग असलेल्या निवासांची निवड करून उच्च दर्जाची खात्री दिली जाते.
या सुविधेचा लाभ सध्या अजमेर, अमृतसर, अयोध्या, शिर्डी, वाराणसी, मथुरा, उज्जैन, रामेश्वरम, तिरुपती, सोमनाथ आणि हरिद्वार यांसारख्या 26 प्रसिद्ध आध्यात्मिक स्थळांवर उपलब्ध आहे. मेक माय ट्रिपच्या अॅप किंवा वेबसाइटवर ‘Loved by Devotees’ टॅगद्वारे प्रवासी ही सुविधा सहज ओळखू शकतात. प्रत्येक सूचीमध्ये निवासाच्या सुविधा, स्थान व प्रवेशयोग्यता यासंबंधी सविस्तर माहिती दिली जाते, ज्यामुळे प्रवाशांना योग्य निर्णय घेणे सोपे जाते. कंपनी लवकरच या सेवेत अधिक स्थळांचा समावेश करून प्रवाशांचा अनुभव आणखी सुखकर करण्याचा मानस आहे. या उपक्रमामुळे आध्यात्मिक प्रवासाचे नियोजन सुलभ होणार असून प्रवाशांना शांतता आणि श्रद्धेचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.