फोटो सौजन्य: Social media
देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सुद्धा वाढताना दिसत आहे. वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे अनेक ग्राहक सध्या इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेता अनेक दुचाकी उत्पादक कंपनी अत्याधुनिक फीचर्स असणाऱ्या स्कूटर मार्केटमध्ये लाँच करत आहे. नुकतेच बजाज ऑटोने एक जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणले आहे.
बजाज ऑटोने 20 डिसेंबरला त्यांच्या लोकप्रिय चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन मॉडेल केली आहे. टू-व्हीलर ब्रँडने सर्व-नवीन चेतक 35 सिरीज लाँच केली आहे. ही स्कूटर अपग्रेड फीचर्सने सुसज्ज आहे. यासोबतच यामध्ये अनेक उत्तमोत्तम फीचर्सही देण्यात आले आहेत. तसेच, ते पूर्वीपेक्षा अधिक रेंजसह आले आहे. नवीन बजाज चेतक 35 सीरीज कोणत्या फीचर्ससह आणली आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
Year Ender 2024: ‘या’ आहेत 2024 मधील सर्वात Best SUV, लाँच होताच ग्राहकांची बुकिंगसाठी झुंबड
चेतक 35 सिरीज पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर आणण्यात आली आहे. यात 3.5 kWh अंडरफ्लोर बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी अशा प्रकारे ठेवण्यात आले आहे की त्याची हँडलिंग पूर्वीपेक्षा चांगली होईल. यात 35 लीटर अंडर-सीट स्टोरेज देखील आहे, ज्यामध्ये तुम्ही हेल्मेट आणि इतर महत्त्वाच्या वस्तू ठेवू शकता. चार्जिंगसाठी वेगळा कंपार्टमेंट देण्यात आला आहे, ज्यामुळे स्टोरेज आणखी चांगले होते.
नवीन चेतक 35 सिरीजबद्दल, बजाज ऑटोने दावा केला आहे की त्यातील बॅटरीची वास्तविक रेंज 125 किमी आहे आणि पूर्ण चार्ज केल्यावर 153 किमीचा दावा केला आहे. 950-वॉट चार्जरच्या मदतीने, ते 3 तास 25 मिनिटांत 80% चार्ज होते. बजाज ऑटोने दावा केला आहे की नवीन चेतक 35 सीरीजचा टॉप स्पीड 73 किमी प्रति तास आहे. यात इको आणि स्पोर्ट्स दोन्ही मोड आहेत.
भारतातील EV मार्केट 2030 पर्यंत 20 लाख कोटींचे होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास
यात रंगीत टीएफटी डिस्प्ले आहे, ज्यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल कंट्रोल आणि म्युजिक मॅनेजमेंट यासारख्या सुविधा आहेत. यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला होईल. यासोबतच चेतक 35 सिरीजमध्ये कॉल अटेंडिंग, म्युझिक कंट्रोल आणि थेट डिस्प्लेवर रिअल-टाइम नोटिफिकेशन्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
नवीन चेतकमध्ये हॉर्सशू आकाराचे डीआरएल, ट्यूबलर मेटल बॉडी, रिमोट इमोबिलायझर, स्पीड अलर्ट, थीफ अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
नवीन बजाज चेतक 3502 आणि चेतक 3501 या दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. चेतक 3502 ची किंमत 1.2 लाख रुपये आणि चेतक 3501 ची किंमत 1.27 लाख रुपये आहे. नवीन बजाज चेतक 35 भारतीय बाजारपेठेत TVS iQube, Ather Rizta, Ampere Nexus आणि Ola S1 शी स्पर्धा करताना दिसेल.