फोटो सौजन्य: YouTube
सध्या भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक कार्स लाँच होत आहे. यामध्ये मुख्यतः इलेक्ट्रिक कार्सचे प्रमाण जास्त आहे. या नवीन कार्सन ग्राहकांकडून सुद्धा चांगली मागणी मिळत आहे. पाह काही कार्स अशा असतात कि कितीही नवीन कार्स लाँच झाल्या तरी त्यांची मार्केटमधील क्रेज काही कमी होत नाही. इथे आम्ही महिंद्रा स्कॉर्पिओ बद्दल बोलत आहोत. पण तुम्ही कधी विचार केलाय ही कार १ लिटर पेट्रोल डिझेलमध्ये कितीचा मायलेज देत असेल?
जर तुम्ही Scorpio-N चे पेट्रोल किंवा डिझेल मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे मायलेज तपासणे. आज आपण Scorpio-N च्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेलच्या मायलेजबद्दल जाणून घेणार आहोत.
महिंद्राची ही कार दोन इंजिन पर्याय आहेत, एक 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि दुसरे 2.2 लिटर डिझेल इंजिन आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह ऑफर केले जाते.
Mahindra Scorpio-N च्या 2.0L Turbo Petrol-MT पॉवरट्रेनचे मायलेज 12.70kmpl आहे, तर 2.0L Turbo Petrol-AT चे मायलेज 12.12kmpl आहे. याशिवाय, 2.2L डिझेल-MT पॉवरट्रेनचे मायलेज 15.42kmpl आहे. यासह, 2.2L डिझेल AT चे मायलेज 15.42kmpl आहे. दोन्ही इंजिन पर्याय 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड AMT सह जोडलेले आहेत.
हे देखील वाचा: तुम्ही सुद्धा उतारावर कार बंद करून चालवता? पेट्रोल वाचवायचा नादात होऊ शकते इंजिन खराब
एक 2.2-लिटर डिझेल युनिट, व्हेरियंटच्या आधारावर 132 PS/300 Nm किंवा 175 PS/400 Nm पर्यंत आउटपुट निर्माण करते आणि 2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन 203 PS/380 Nm पर्यंत उत्पादन करते. 2024 महिंद्रा स्कॉर्पिओची एक्स-शोरूम किंमत 13 लाख 85 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 24.54 लाख रुपयांपर्यंत जाते. ही किमंत प्रत्येक शोरूमनुसार बदलू शकते.
Scorpio N च्या प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर, यात 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग समाविष्ट आहे. यात 6-वे-पॉवर ड्रायव्हर सीट, सनरूफ आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचाही समावेश आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, यात 6 एअरबॅग्ज, फ्रंट आणि रिअर कॅमेरे, हिल-असिस्ट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) सारख्या फीचर्सचा समावेश आहे. बाजारात ही कार टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लस सारख्या कारशी स्पर्धा करते.