Car Maintenance Tips (Photo Credit - X)
अनेकांना वाटते की विमा प्रीमियम कमी करणे शक्य नाही, पण योग्य पर्यायाची निवड केल्यास मोठी बचत होते. ‘पे अॅज यू ड्राईव्ह’ (Pay As You Drive) जर तुमची कार जास्त चालत नसेल, तर हा पर्याय निवडा. यात तुमच्या किलोमीटरनुसार प्रीमियम ठरवला जातो. जर तुमचे वार्षिक रनिंग ५,००० ते ७,००० किमी असेल, तर तुम्ही सामान्य विम्याच्या तुलनेत खूप कमी प्रीमियम भरू शकता.
लोक अनेकदा पैसे वाचवण्यासाठी सर्व्हिसिंग पुढे ढकलतात, पण यामुळे दीर्घकाळात मोठा फटका बसू शकतो. वेळेवर इंजिन ऑइल बदलणे, ब्रेक तपासणे आणि ट्यूनिंग केल्यामुळे इंजिनवर ताण येत नाही, परिणामी मायलेज वाढते. वेळीच केलेली देखभाल भविष्यातील मोठ्या तांत्रिक बिघाडांना आणि हजारो रुपयांच्या खर्चाला रोखू शकते.
वाहन चालवणे होईल अधिक स्वस्त, CNG च्या किमतीत होणार घट; खिशाला पडणार नाही भगदाड
कारचे एअर फिल्टर हे इंजिनच्या फुफ्फुसासारखे असते. ते घाणेरडे झाल्यास इंजिनला पुरेशी हवा मिळत नाही. यामुळे इंजिनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो आणि गाडी जास्त इंधन खाऊ लागते. प्रत्येक सर्व्हिसिंगला एअर फिल्टर स्वच्छ करा किंवा गरज असल्यास बदलून घ्या. यामुळे गाडीचे मायलेज सुधारण्यास मदत होते.
टायर्समध्ये हवा कमी असल्यास इंजिनवर दाब येतो आणि इंधन जास्त वापरले जाते. आठवड्यातून एकदा टायर प्रेशर तपासा. अचानक ब्रेक मारणे किंवा वेगाने गाडी पळवणे टाळा. स्थिर वेगाने गाडी चालवल्यास इंधनाची मोठी बचत होते. योग्य विमा योजना, वेळेवर सर्व्हिसिंग आणि छोट्या तांत्रिक गोष्टींकडे लक्ष दिल्यास कारचा खर्च ओझे वाटणार नाही. थोडेसे प्रसंगावधान आणि योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही दरवर्षी किमान १० ते १५ हजार रुपयांची बचत करू शकता.






