फोटो सौजन्य: Freepik
आता पावसाळा संपून थंडीचे दिवस चालू होणार आहेत. या थंडीच्या दिवसात अनेक जण बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवत असतात. महाबळेश्वर असो की दापोली, सगळीच थंड हवेचे ठिकाणे तुम्हाला या मोसमात पर्यटकांनी भरलेले दिसणार. या मोसमात कित्येक जण आपली प्रायव्हेट व्हेईकलसोबत फिरताना दिसतात. शेवटी आपल्या कारमधून फिरण्याची मजा सुद्धा काही औरच असते.
जर तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत कुठेतरी लॉंग ट्रिपवर जायचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊया, अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांच्यावर तुम्ही लॉंग ट्रिपवर जाण्याआगोदर लक्ष दिले पाहिजे.
हे देखील वाचा: कार घेताना इंजिंमधील CC, BHP आणि RPM का आहे महत्वाचे? जाणून घ्या …
जर तुम्ही तुमच्या कारसह लॉंग ट्रिपवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर बाहेर जाण्यापूर्वी नक्कीच तुमच्या कारची सर्व्हिस करून घ्या. यामुळे कारमधील दोष तुमच्या लक्षात येतील. अन्यथा, प्रवासादरम्यान काही गडबड झाल्यामुळे तुमच्या ट्रीपची संपूर्ण मजा खराब होऊ शकते. याशिवाय वाहनाचे ब्रेक, ऑइल, वायपर, एसी आणि कूलंट योग्य प्रकारे काम करत आहेत हेही लक्षात ठेवा.
फक्त प्रवासाला जातानाच नाही तर साधी कार बाहेर फिरवताना सुद्धा त्याची मूळ कागदपत्रे सोबत ठेवावीत. अलीकडच्या काळात, जवळजवळ प्रत्येकजण त्यांच्या फोनमध्ये आपल्या वाहनांची कागदपत्रे सेव्ह करून ठेवतात. पण प्रवासात अचानक तुमचा फोन डिस्चार्ज झाला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे लांबच्या प्रवासाला जाताना नेहमी वाहनाची मूळ कागदपत्रे सोबत ठेवा.
जेव्हा तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल तेव्हा तुमच्या गाडीत अतिरिक्त टायर म्हणजेच स्टेपनी ठेवा. तुमच्या कारमध्ये स्टेपनी आधीच इन्स्टॉल केलेले असल्यास, ते बरोबर आहे की नाही ते नीट तपासा. तुमच्या कारमध्ये स्टेपनी असल्याने जर अज्ञात ठिकाणी तुमच्या कारचे टायर अचानक पंक्चर झाल्यास, तुम्ही तो बदलून तुमचा प्रवास पुन्हा सुरू करू शकता.
लॉंग ट्रिपला निघण्यापूर्वी जंपर केबल्स सोबत ठेवा. तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जात असाल तर जंपर केबल्स सोबत ठेवायला विसरू नका. अनेकवेळा असे होते की कारची बॅटरी डाऊन होते, त्यामुळे ती सुरू करण्यात खूप अडचणी येतात. या परिस्थितीत, जम्पर केबल्सच्या मदतीने, तुम्ही तुमच्या कारची बॅटरी चार्ज करू शकता आणि ती पुन्हा सुरू करू शकता.
तुमची ट्रिप छोटी असो वा मोठी, कारमध्ये नेहमी फर्स्ट एड किट ठेवत चला. या बॉक्समध्ये तुम्ही ताप, खोकला, उलट्या, डोकेदुखी, इत्यादी आरोग्यासंबंधित समस्यांची औषधे ठेवू शकता. प्रवासादरम्यान कोणी आजारी पडल्यास, हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.