फोटो सौजन्य: Social Media
सध्या जगभरात अनेक ऑटो कंपनीज आपल्या इलेक्ट्रिक कार्स जागतिक मार्केटमध्ये लाँच करत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक त्रस्त ग्राहक इलेक्ट्रिक कार्सचा वापर करत आहे. तसेच येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांच्या कार्सच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या होंडा कंपनी सुद्धा एक भन्नाट इलेक्ट्रिक कार आणायच्या तयारीत आहे.
होंडाच्या नवीन इलेक्ट्रिक कारचे डिझाइन आकर्षक आणि दर्जेदार आहे. ही जपानी कार उत्पादक कंपनी अशी कार आणण्याच्या तयारीत आहे, जिला पाहून कारप्रेमी या कारचे दिवाने होतील. होंडाने या कारच्या कॉन्सेप्ट मॉडेलची झलक यापूर्वीच दाखवली आहे.
Honda ने त्याच्या ब्रँडचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी त्यांच्या जागतिक EV पोर्टफोलिओचे वर्णन केले आहे. या व्हिडिओमध्ये, कंपनीने सांगितले की आम्ही इलेक्ट्रिक कार बनवताना तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे – Thin, Light आणि Wise.
हे देखील वाचा: कार चालवताना तुम्ही सुद्धा Sunroof उघडत का? जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान
कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक कारचे नाव Honda 0 ठेवले आहे. Honda ने या वर्षाच्या सुरुवातीला कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2024 मध्ये या EV चे कंसेप्ट मॉडेल सादर केले होते.
होंडाच्या नवीन इलेक्ट्रिक कारचे डिझाईन खूपच आकर्षक असणार आहे. तसेच या कारमध्ये AI चा सुद्धा वापर होणार आहे. होंडाची ही ईव्ही अधिक चांगल्या इलेक्ट्रिक एफिशियंसी आणि कार्यक्षमतेसह येऊ शकते. सुरक्षिततेसाठी या कारमध्ये ADAS फीचर दिले जाऊ शकते.
या होंडा इलेक्ट्रिक कारचे डिझाईन इतके जबरदस्त आहे की जपानी ऑटोमेकरच्या या कॉन्सेप्टला ‘रेड डॉट: बेस्ट ऑफ द बेस्ट 2024’ हा पुरस्कारही मिळाला आहे. या कारचा लूक अनोखा बनवण्यासाठी साईड विंडोवर सिंगल ग्लास पॅनल बसवण्यात आले आहे.
Honda 2026 मध्ये जागतिक बाजारपेठेत होंडा आपली नवीन EV सिरीज आणत आहे. Honda 0 सिरीज ही प्रथम नॉर्थ अमेरिकन बाजारपेठेत लाँच केली जाईल. होंडाच्या कारवरील नवीन H मार्क दर्शविते की कंपनी ऑटोमेकर जगाला नवीन पिढीची ईव्ही देण्याची तयारी करत आहे. या आलिशान कारमध्ये लोकांना बसण्यासाठी मोठी जागा आणि चालवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असणार आहे.