फोटो सौजन्य: iStock
सध्या देशभरात अनेक ऑटो कंपनीज आपल्या इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये लाँच करत आहे. पूर्वी रस्त्यांवर इलेक्ट्रिक कार दिसली की सगळे तिच्याचकडे बघत राहायचे. पण आज वाढत्या उत्पादनामुळे इलेक्ट्रिक कार्स आता रोजच्या झाल्या आहेत. तसेच येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे.
नुकतेच फाडा म्हणजेच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने एक अहवाल सादर केला आहे. यात कोणत्या कंपनीजने जास्तीतजास्त इलेक्ट्रिक कार्स विकण्याच्या बाबतीत बाजी मारली आहे याबाबत माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया सप्टेंबर 2024 मध्ये एकूण किती इलेक्ट्रिक कार्स विकल्या गेल्या आहे.
हे देखील वाचा: Maruti Suzuki Grand Vitara Dominion एडिशन लॉंच, जाणून घ्या कारबद्दल
सप्टेंबर 2024 मध्ये इलेक्ट्रिक कारच्या विक्रीबाबत FADA कडून अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार, गेल्या महिन्यात देशभरात एकूण 5874 इलेक्ट्रिक कारची विक्री झाली. आकडेवारीनुसार, यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये ही संख्या 6368 युनिट्स इतकी होती.
गेल्या महिन्यात टाटा मोटर्सने सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. अहवालानुसार, कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये 3621 इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली आहे. तर 2023 मध्ये टाटाने 4325 युनिट्स विकल्या होत्या.
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार एमजीने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 977 इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली आहे. तर यापूर्वी 2023 मध्ये याच कालावधीत कंपनीने 895 युनिट्सची विक्री केली होती.
XUV 400 केवळ इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये महिंद्राने ऑफर केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात 454 युनिट्सची विक्री केली आहे. यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये ही संख्या 358 युनिट्स होती.
पीसीए ऑटोमोबाईल, जे Citroen च्या EC3 ऑफर करते, गेल्या महिन्यात 386 युनिट्सची विक्री केली. तर वार्षिक आधारावर कंपनीने गेल्या वर्षी केवळ 143 युनिट्सची विक्री केली होती.
चिनी वाहन उत्पादक कंपनी बीवायडीचाही टॉप-5 यादीत समावेश झाला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने देशभरात 163 युनिट्सची विक्री केली आहे. यापूर्वी 2023 मध्ये ही संख्या 151 युनिट्स होती.
FADA अहवालानुसार टॉप-5 व्यतिरिक्त, BMW ने 106 युनिट्स, मर्सिडीज 81, Hyundai 26, Kia 17 आणि Volvo 15 युनिट्स विकल्या आहेत.






