फोटो सौजन्य: YouTube
भारतात सुपरकार्सची नेहमीपासूनच चर्चा होत आली आहे. आजही आपल्याला जर रस्त्यावर एखादी सुपरकार दिसली कि अनेक जण तिच्या भोवती गोळा होताना दिसतात. काही तर चक्क फोटो सुद्धा काढतात. यावरून आपलीकडे सुपरकार्सची किती जास्त क्रेज आहे ते दिसते. ही क्रेज बघता अनेक सुपरकार निर्मात्या कंपनीज भारतात आपल्या सुपरकार्स लाँच करत असतात.
नुकतेच Maserati या इटालियन सुपर कार निर्माता कंपनीने आपली नवीन सुपरकार GranTurismo भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या कारचे दोन व्हेरियंटस भारतात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मोडेना आणि ट्रोफीओ असे या व्हर्जनची नावे आहेत.
ही कार कोणत्या किंमतीला खरेदी केले जाऊ शकतात, त्यामध्ये कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये प्रदान केली आहेत. किती दमदार इंजिन देण्यात आले आहे. बाजारात ती कोणत्या कार्ससोबत स्पर्धा करेल? याबद्दल आपण जाणून घेऊया.
या सुपरकारमध्ये तीन लिटर क्षमतेचे इंजिन दिले आहे. परंतु मोडेना आणि ट्रोफीओमध्ये पॉवर आउटपुट भिन्न आहेत. Maserati GranTurismo Modena मध्ये तीन-लिटर V6 इंजिन आहे जे ते 490 हॉर्स पॉवर आणि 600 न्यूटन मीटर टॉर्क देते. या इंजिनसह 0-100 किमीचा वेग मिळविण्यासाठी या कारला फक्त 3.9 सेकंद लागतात. यावरूनच या कारचा दमदार परफॉर्मन्स लक्षात येतो. आता आपण दुसऱ्या व्हेरियंटच्या इंजिनबद्दल जाणून घेऊया.
Maserati GranTurismo Trofeo मध्ये देखील तेच तीन लिटर इंजिन आहे पण ते अधिक चांगले ट्यून केले गेले आहे ज्यामुळे या कारला 550 हॉर्स पॉवर आणि 650 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. अधिक शक्तीमुळे, ट्रोफीओला 0-100 किमी प्रतितास वेग येण्यासाठी 3.5 सेकंद लागतात. या व्हेरियंटमध्ये ऑल व्हील ड्राइव्ह स्टँडर्ड म्हणून देण्यात आले आहे.
या सुपरकारमध्ये कंपनीकडून अनेक उत्कृष्ट फीचर्स ऑफर करण्यात आले आहे. या सुपरकारचा काही भाग कार्बन फायबरपासून बनवला गेला आहे जे त्याचे वजन कमी करण्यास मदत करते. कारमध्ये 20 आणि 21 इंच टायर, 12.2 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 8.8 इंच स्क्रीनमध्ये क्लायमेट कंट्रोल फीचर्स आहेत. हेड-अप डिस्प्ले, सोनस फॅबर ऑडिओ सिस्टम, डिजिटल घड्याळ आणि इतर अनेक फीचर्स ऑफर करण्यात आली आहेत.
बापरे! एवढी किंमत
आधी सांगितल्याप्रमाणे Maserati GranTurismo दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आली आहे. याचे मोडेना व्हेरिएंट 2.72 कोटी रुपये एक्स-शोरूम किंमतीत आणले गेले आहे, तर ट्रोफीओ व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 2.90 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. बाजारात या कारची स्पर्धा BMW M8 Competition, Ferrari Roma, Aston Martin यांसारख्या कारशी होईल.