फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक कार्स लाँच होताना दिसत आहे. या कार्समध्ये ऑटो कंपनी विविध अत्याधुनिक फीचर्स देखील समाविष्ट करत आहे. म्हणूनच अनेक कार्सच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नुकतेच मार्केटमध्ये अनेक कार्स लाँच झाल्या होत्या, त्यातीलच एक कार म्हणजे किया कार्निवल.
प्रीमियम MPV सेगमेंटमध्ये, Kia ने ऑक्टोबर 2024 मध्येच नवीन जनरेशन Kia कार्निवल लाँच केली होती. लाँच झाल्यापासून ही कार देशात खूप पसंत केली जात आहे. या नवीन कारची अवघ्या दोन महिन्यांत 400 हून अधिक युनिट्सची डिलिव्हरी झाली आहे. आता तर या कारसाठीचा वेटिंग पिरियड देखील वाढला आहे. आज बुक केल्यास ते किती वेळेत घरी नेता येईल? हे आपण या बातमीत जाणून घेऊया.
कार्निवल MPV ची नवीन जनरेशन दक्षिण कोरियाच्या ऑटोमोबाईल उत्पादक Kia ने ऑक्टोबर 2024 मध्ये लाँच केली होती. या प्रीमियम MPV ला भारतात जास्त मागणी मिळत आहे. याममुळे आता कारचा वेटिंग पिरियड देखील वाढला आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया.
कियाकडून सांगण्यात आले आहे की जर ही कार आजच बुक केली गेली तर तुम्हाला डिलिव्हरीसाठी सहा महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागेल. बुकिंग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 3350 युनिट्सचे बुकिंग झाले आहे.
कार्निवलच्या नवीन जनरेशनमध्ये किआने अनेक उत्तमोत्तम फीचर्स दिले आहेत. यात ड्युअल सनरूफ, 12.3 इंच वक्र डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, स्मार्ट पॉवर स्लाइडिंग डोअर, मागील एलईडी कॉम्बिनेशन लॅम्प, फ्रंट एलईडी फॉग लॅम्प, व्हेंटिलेशनसह सेकेंड रो पावर्ड सीट्स, 12 स्पीकरसह बोस प्रीमियम साउंड सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, हेड अप आहे. डिस्प्ले, 18 इंच अलॉय व्हील्स, थ्री झोन पूर्णपणे ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, आठ एअरबॅग्ज, रियर क्रॉस ट्रॅफिक कोलिजन अव्हायन्स सिस्टीम यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.
लाँच झाल्याच्या अल्पावधीतच ‘ही’ कार ठरली सुपरहिट! विकल्या 94000 पेक्षा जास्त युनिट्स
कार्निवलची नवीन जनरेशनमध्ये 2151 cc स्मार्टस्ट्रीम इन-लाइन फोर-सिलेंडर CRDI इंजिन वापरते. यामुळे त्याला 193 PS चा पॉवर मिळतो. 2WD सोबत आठ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही कार 72 लीटरच्या इंधन टाकीसह आणण्यात आले आहे. यात ड्रायव्हिंगसाठी इको, नॉर्मल, स्पोर्ट आणि स्मार्ट मोड आहेत.
हे कंपनीने भारतात CBU म्हणून लॉन्च केले आहे. हे फक्त लिमोझिन आणि लिमोझिन प्लस या दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 63.9 लाख रुपयांपासून सुरू होते. जी नक्कीच सर्वसामान्यांना परवडणारी नाही आहे.