फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये नेहमीच ग्राहक अशा बाईक्सना प्राधान्य देत असतात ज्या चांगल्या मायलेज देत असतात. अशा बाईक मार्केटमध्ये लगेच विकल्या जातात. त्यामुळेच प्रत्येक ऑटो कंपनी आपल्या बाईकमध्ये उत्तम फीचर्ससह जबरदस्त मायलेज देण्याचा प्रयत्न करत असते. तसेच आपली बाईक दिसण्यात सुद्धा आकर्षक बनवण्यात कंपनीचा कल असतो.
देशात अनेक उत्तम बाईक्स उपलब्ध आहेत, ज्या त्यांच्या उत्तम मायलेजसाठी ओळखल्या जातात. यातीलच एक बाईक म्हणजे होंडा कंपनीची युनिकॉर्न. ही बाईक अनेक वर्षांपासून भारतीयांची आवडती बाईक बनली आहे. याचे कारण म्हणजे या बाईकचा मायलेज.
होंडा कंपनी अनेक वर्षांपासून उत्तमोत्तम बाईक लाँच करत आहे. कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या आणि बजेट फ्रेंडली बाईक्स ऑफर करत असतात. कंपनीची सर्वात बेस्ट मायलेज देणारी बाईक म्हणजे होंडा युनिकॉर्न. आता कंपनीने या बाईकचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. या बाईकला नव्या रूपात आणले आहे.
यंदाचं मार्केट गाजवलं ते इलेक्ट्रिक कार्सनेच, पण विकत घेताना लक्षात घ्या ‘या’ गोष्टी
Honda India ने नवीन अपडेट्ससह Honda Unicorn भारतीय बाजारात लाँच केली आहे. या बाईकमध्ये नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच यामध्ये अनेक अपडेट्सही करण्यात आले आहेत, ज्यामुळे ते पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त झाले आहे. 2025 Honda Unicorn कोणत्या नवीन फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
2025 Honda Unicorn मध्ये नवीन LED हेडलाइट आहे, जे आधी सादर केलेल्या हॅलोजन हेडलाइटची जागा घेतो. त्याच वेळी, ते त्यापेक्षा बरेच चांगले आहे. यात 162.71cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे आता OBD2B अनुरूप आहे. यामध्ये बसवलेले इंजिन 13.18PS ची पॉवर आणि 14.58Nm टॉर्क जनरेट करते.
नवीन Honda Unicorn मधील नवीन कन्सोल स्पीड, इंधन-स्तर, वेळ, ट्रिपमीटर आणि ओडोमीटर रीडआउट यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. कन्सोलचा लेआउट उत्कृष्ट आहे आणि नवीन टॅकोमीटर रीडआउटची जोडणी सोयीमध्ये भर घालते.
याव्यतिरिक्त, यात सर्व्हिस ड्यू अलर्ट, तसेच इको इंडिकेटर सारख्या गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये दिलेले इको इंडिकेटर हे अतिशय उत्तम फीचर्स देण्यात आले आहे, जे रायडर्सना मायलेज वाढवण्यास मदत करेल. यामुळेच तर ही बाईक अल्पावधीतच भारतीयांकनही आवडती बाईक बनली आहे.
जुन्या कार्सवरील वाढलेल्या GST मुळे गोंधळात पडलात का? जाणून घ्या याबद्दलची सविस्तर माहिती
बाईकमध्ये USB Type-C चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आला आहे. हे रायडर्सना प्रवासात त्यांचा फोन सहज चार्ज करण्यास मदत करते.
होंडा युनिकॉर्नचा मायलेज हा खूप दमदार आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 60 किमीची रेंज देते.