फोटो सौजन्य: YouTube
सध्या भारतात इलेक्ट्रिक कार्स खूप मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. एकीकडे पेट्रोल, सीएनजी, आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने अनेक कार खरेदीदार आता इलेक्ट्रिक कार्सकडे वळत आहे. तसेच येणार काळ पाहता अनेक जण इलेक्ट्रिक कार्सची मागणी अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अनेक कार उत्पादक कंपनीज इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहे.
नुकतीच MG Windsor EV भारतीय कार मार्केटमध्ये लाँच झाली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही तिच्या लूक आणि दमदार परफॉर्मन्ससाठी चर्चिली जात आहे. चला या नवीन इलेक्ट्रिक कारबद्दल अधिक जाणून घेऊया.
बिझनेस क्लास कम्फर्टः एमजी विंडसर ईव्हीचे इंटिरिअर बिझनेस क्लास सीट्स प्रमाणे डिझाईन केले आहेत. प्रवाशांना जास्तीत जास्त आराम देण्यासाठी यांना डिझाइन करण्यात आले आहे. या सीट्समध्ये उच्च-गुणवत्तेच्या लेदर अपहोल्स्ट्री, इलेक्ट्रिक समायोजन आणि मसाजिंग फंक्शंस आहेत.
मोठे पॅनोरामिक सनरूफ: कारमध्ये मोठे पॅनोरामिक सनरूफ देण्यात आले आहे, ज्यामुळे केबिन अधिक हवादार आणि मोकळे वाटते.
फ्लॅट-बेड सीट्स: बिझनेस क्लासच्या धर्तीवर, या ईव्हीच्या मागील सीट फ्लॅट-बेडमध्ये बदलल्या जाऊ शकतात, ज्यामुळे जर तुमचा लांबचा प्रवास असेल तर तो आणखी आरामदायी होतो.
AI आधारित इन्फोटेनमेंट सिस्टम: ही कार अत्याधुनिक इन्फोटेनमेंट सिस्टमने सुसज्ज आहे, जी AI वर आधारित आहे. हे व्हॉइस कमांड, नेव्हिगेशन आणि विविध कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह येते. कारमध्ये 8.8-इंचाचा TFT डिजिटल मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID), 15.6-इंच इंटेलिजेंट कंट्रोल पॅनल आहे.
360-डिग्री कॅमेरा आणि ADAS: सुरक्षिततेसाठी, यात 360-डिग्री कॅमेरा, Advanced Driver Assistance System (ADAS) आणि ऑटोनॉमस फीचर्स देण्यात आले आहेत, जे तुमच्या ड्रायव्हिंगला अतिशय सुरक्षित आहे.
कारमध्ये 38 kWh क्षमतेचा लिथियम फेरो फॉस्फेट (LFP) बॅटरी पॅक उपलब्ध आहे. ही कार एका चार्जमध्ये अंदाजे 331 किमीची रेंज देते. पर्मनंट मॅग्नेट इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक कारमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प, इलेक्ट्रिक साइड मिरर, फ्लश डोअर हँडल, ऑटो रेन सेन्सिंग वायपर्स, रिअर डिफॉगर यांसारखी फीचर्स आहेत. या इलेक्ट्रिक मोटर 136PS पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते.
सेमी-ऑटोनोमस ड्रायव्हिंग: ही कार काही सेमी-ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर्ससह येते, ज्यामुळे तुमची ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर होते. तसेच यात कनेक्टेड कार फीचर्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे कारला मॉनिटर आणि नियंत्रण करू शकता.
MG Windsor EV ही कार 9.99 लाख रुपयांच्या किंमतीत (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आली आहे. कंपनीने विंडसरला 3 व्हेरियंटस आणि 4 रंगांमध्ये सादर केले आहे.