फोटो सौजन्य: X.com
ऑटो बाजारात ग्राहकांच्या बजेट आणि आवश्यकतेनुसार ऑटो कंपन्या कार ऑफर करत असतात. यातही सर्वात जास्त मागणी ही एसयूव्ही विभागातील कार्सना असते. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये हाय परफॉर्मन्स एसयूव्ही ऑफर करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही सुद्धा भारतीय रस्त्यांवर धावू लागल्या आहेत.
भारतात अनेक एसयूव्ही पाहायला मिळतील. रेनॉल्ट कंपनीकडून या सेगमेंटमध्ये किगर फेसलिफ्ट लाँच केली आहे. ही एसयूव्ही मारुती फ्रॉन्क्सशी स्पर्धा करते. इंजिन, फीचर्स, मायलेज आणि किंमतीच्या बाबतीत, दोन्ही एसयूव्हीपैकी कोणती तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
रेनॉल्टने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Kiger सादर केली आहे. या एसयूव्हीच्या फेसलिफ्टमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी फॉग लॅम्प्स, एलईडी टेल लाईट्स, ब्लॅक रूफ रेल, 16-इंच अलॉय व्हील्स, टर्बो व्हेरिएंटमध्ये रेड ब्रेक कॅलिपर, ड्युअल टोन इंटिरिअर, स्टोरेजसह फ्रंट आर्मरेस्ट, अँबियंट लाईट, सात-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट, वायरलेस फोन चार्जर, पुश बटण स्टार्ट, आठ-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार प्ले, टीपीएमएस अशी अनेक फीचर्स आहेत.
तर दुसरीकडे, मारुतीने ऑफर केलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही Fronx मध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. कंपनीने एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, ऑटो हेडलॅम्प, एलईडी कनेक्टेड टेल लाईट, रिअर वायपर आणि वॉशर, स्पॉयलर, स्किड प्लेट, शार्क फिन अँटेना, ड्युअल टोन एक्सटीरियर, फॅब्रिक सीट, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग व्हील, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ओआरव्हीएम, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, हाइट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर एसी व्हेंट, फूटवेल इल्युमिनेशन, 22.86 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, आणि यासारखे अनेक फीचर्स आहेत.
रेनो Kiger मध्ये कंपनीकडून 1.0-लीटर नेचरल ॲस्पिरेटेड आणि 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय दिले आहेत. यातील नेचरल ॲस्पिरेटेड इंजिनमधून कारला 72 PS पॉवर आणि 100 Nm टॉर्क मिळतो, तर टर्बो इंजिनमधून 96 PS पॉवर आणि 160 Nm टॉर्क निर्माण होतो. हे इंजिन्स Manual, AMT आणि CVT ट्रान्समिशनच्या पर्यायांसह उपलब्ध आहेत.
मारुती फ्रॉन्क्समध्ये कंपनीने 1.2-लीटर नेचरल ॲस्पिरेटेड पेट्रोल, 1.2-लीटर CNG आणि 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय दिले आहेत. यातील 1.2-लीटर पेट्रोल इंजिनमधून कारला 66 kW पॉवर आणि 113 Nm टॉर्क मिळतो. तर 1.0-लीटर टर्बो इंजिनमधून 73.6 kW पॉवर आणि 147.6 Nm टॉर्क मिळतो. या दोन्ही इंजिन्समधून कारला 20.02 kmpl ते 22.89 kmpl इतका मायलेज मिळतो. यात Manual आणि AMT ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.
रेनॉल्टने भारतात किगर फेसलिफ्ट 6.29 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आहे. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 11.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
दुसरीकडे, मारुती भारतात रेनॉल्ट 7.58 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर करते. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 13.06 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.