फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक उत्तम आणि बेस्ट ऑटो कंपन्या आहेत ज्या आपल्या ग्राहकांसाठी उत्तोमोत्तम कार मार्केटमध्ये आणत असतात. मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये अनेक बेस्ट कार मार्केटमध्ये लाँच झाल्या. त्यातीलच एक म्हणजे Skoda kylaq.
युरोपियन वाहन निर्माता स्कोडाने देशात आकर्षक कार सादर केल्या आहेत. नुकतेच नोव्हेंबर 2024 मध्ये कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्कोडा कायलॅक लाँच केली होती. आता या कारची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात आली आहे. या कारमध्ये किती शक्तिशाली इंजिन आहे, यात कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले जातात? ही कार कोणत्या किंमतीत खरेदी करता येईल? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
केवळ 3000 रुपयांमध्ये बुक होणार Keeway ची धमाकेदार बाईक, किमतीपासून फिचर्सपर्यंत सर्व माहिती
स्कोडा कंपनीने भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून लाँच केलेल्या नवीन एसयूव्ही स्कोडा कायलॅकची डिलिव्हरी सुरू झाली आहे. ही एसयूव्ही कंपनीने नोव्हेंबर २०२४ मध्ये सादर केली होती, त्यानंतर तिच्या बेस व्हेरियंटची किंमत जाहीर करण्यात आली आणि काही काळानंतर तिच्या सर्व व्हेरियंटच्या किंमती जाहीर करण्यात आल्या.
Skoda Kushaq फीचर्समध्ये कंपनीकडून अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात शाइनी ब्लॅक फ्रंट ग्रिल, १७ इंच अलॉय व्हील्स, एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाईट्स, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हरसाठी ६ वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सीट्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, सिंगल पेन इलेक्ट्रिक सनरूफ, 20.32 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, 25.6 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, ट्रंकमध्ये तीन किलो क्षमतेचा हुक अशी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीने ही एसयूव्ही अनेक उत्कृष्ट सेफ्टी फीचर्ससह सादर केली आहे. यात 25 हून अधिक अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स दिले गेले आहेत. ज्यामध्ये सहा एअरबॅग्ज, ब्रेक डिस्क वाइपिंग, ईएससी, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक आणि मल्टी-कोलिजन ब्रेक यांचा समावेश आहे.
भारतात जुनी वाहने बाजारपेठ झपाट्याने विस्तारत; 2030 पर्यंत विक्रीत मोठी वाढ अपेक्षित
स्कोडा कायलॅक एसयूव्ही भारतात 7.89 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारची बुकिंग 2 डिसेंबरपासून सुरू झाली होती आणि आता त्याची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आली आहे.
स्कोडा ही कायलॅक एसयूव्ही चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर करते. ही एसयूव्ही बाजारात थेट टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, किआ सोनेट, किआ सायरोस, ह्युंदाई व्हेन्यू सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करते. याशिवाय, लवकरच या कारला किया सायरोसकडूनही स्पर्धा करावी लागेल.