ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग (photo Credit- X)
रेल्वे रुळांवरील कचरा गोळा करणाऱ्या एका विशेष मालगाडीचा डबा कुर्ला येथील ‘ईएमयू सायडिंग’मध्ये उभा होता. रात्री ८.३० च्या सुमारास या कचऱ्याने भरलेल्या पहिल्या डब्यात अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा वाढल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले.
#Mumbai: A fire broke out in a garbage-laden local train parked on the central siding at Kurla and Vidyavihar railway stations.#Mumbai #FireIncident #Kurla #Maharashtra #IndianRailways pic.twitter.com/pD8JMiB1Ai — Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) January 8, 2026
Mumbai Local : काय सांगता! लोकल प्रवासी घटले, तरीही उपनगरीय लोकलला गर्दी
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना पाण्याचा वापर करावा लागणार होता. मात्र, वरून जाणाऱ्या २५,००० व्होल्टच्या हायव्होल्टेज तारांमुळे धोका निर्माण झाला असता. त्यामुळे विद्याविहार ते सायन स्थानकादरम्यान ओव्हरहेड केबलचा (OHE) वीजपुरवठा रात्री ८.३८ ते ८.५५ या वेळेत बंद करण्यात आला. सुरक्षिततेसाठी सीएसएमटीकडे जाणारी ‘अप स्लो’ (UP Slow) मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली होती.
ऑफिसमधून घरी परतण्याच्या वेळेतच ही घटना घडल्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. आग विझल्यानंतर रात्री ८.५५ वाजता वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आणि लोकल वाहतूक धीम्या गतीने पूर्वपदावर आली. सुदैवाने, ही ट्रेन सायडिंग लाईनवर उभी असल्याने कोणताही मोठा अपघात झाला नाही.
Indian Railways News: विनातिकीट प्रवाशांना रेल्वेचा दणका! ९ महिन्यांत वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड






