जवळपास 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल अखेर एकमेकांचे जीवनसाथी झाले आहेत. सोनाक्षी सिन्हाचे आणि झहीर इकबालचे कार कलेक्शन अप्रतिम आहेत जाणून घ्या या कर ची किंमत.
यादरम्यान, सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाच्या फंक्शनचे ताजे फोटो समोर आले आहेत ज्यात दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोघेही त्यांच्या आलिशान कारसोबत अनेकदा दिसले आहेत. सोनाक्षी आणि झहीरच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात
सोनाक्षी सिन्हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंदी' या चित्रपटात दिसली होती. सोनाक्षीने या चित्रपटासाठी 2 कोटी रुपये फी घेतली होती. असे सांगितले जात आहे की सोनाक्षी तिचा पती झहीरसह मुंबईतील वांद्रे येथे 4200 स्क्वेअर फुटांच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट देखील होणार आहे.
हे जोडपे त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला पारंपारिक कपड्यांमध्ये पोहोचले होते. एकीकडे सोनाक्षी सिन्हा लाल रंगाची साडी, केसात गजरा, केसात सिंदूर आणि हातात बांगड्या घातलेली दिसत होती, तर दुसरीकडे जहीर पांढऱ्या रंगाच्या जोधपुरीच्या पोशाखात एकदम डॅशिंग दिसत होता.
सोनाक्षीला तिच्या आलिशान कारसोबत अनेकदा पाहिले गेले आहे. सोनाक्षीकडे मर्सिडीज-बेंझ आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी ब्रँडच्या कार आहेत. त्याच्या गॅरेजमध्ये Mercedes-Benz S360 (किंमत रु. 1.42 कोटी), Mercedes-Benz GLS 350d (किंमत रु. 87.76 लाख) आणि BMW 6 Series GT (किंमत रु. 75.90 लाख) या गाड्यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर झहीरकडे एक लक्झरी कार आणि एक सुपर बाईक देखील आहे. झहीरकडे मर्सिडीज-बेंझ एम-क्लास आहे ज्याची किंमत अंदाजे 56.74 लाख रुपये आहे. त्याच्याकडे डुकाटी स्क्रॅम्बलर सुपर बाईक देखील आहे ज्याची किंमत सुमारे 8 लाख रुपये आहे.