फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात अनेक उत्तम वाहन उत्पादक कंपन्या आहेत. ज्या ग्राहकांच्या मागणीनुसार उत्तम वाहनं ऑफर करत असतात. यात Suzuki चा देखील समावेश आहे. जपानी दुचाकी उत्पादक सुझुकी भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम बाईक्स आणि स्कूटर विकते. कंपनीने अलीकडेच त्यांच्या दोन स्कूटर एका नवीन अपडेटसह लाँच केल्या आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
सुझुकीने 2025 मधील नवीन एवेनिस आणि बर्गमन स्कूटर लाँच केल्या आहेत. या दोन्ही स्कूटरच्या इंजिनमध्ये आता OBD-2B अपडेट करण्यात आले आहे आणि दोन्ही स्कूटरमध्ये काही नवीन रंग पर्याय देखील देण्यात आले आहेत.
Tata Harrier च्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत किती? डिझाइनपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
उत्पादकाने दिलेल्या माहितीनुसार, सुझुकी एवेनिस स्कूटर स्पेशल एडिशन सोबत लाँच करण्यात आली आहे. ज्यामध्ये मेटॅलिक मॅट ब्लॅक आणि मॅट टायटॅनियम सिल्व्हरसारखे रंग देण्यात आले आहेत. सुझुकी बर्गमन स्ट्रीट EX स्कूटर मॅटेलिक मॅट स्टेलर ब्लू रंगात देण्यात आली आहे.
सुझुकी बर्गमन स्ट्रीट 2025 स्कूटर नवीन रंगांमध्ये तसेच ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक / पर्ल मीरा रेड, चॅम्पियन यलो नंबर २ / ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक, ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक / पर्ल ग्लेशियर व्हाइट आणि ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहे.
सुझुकी बर्गमन स्कूटरमध्ये पर्ल मिराज व्हाइट, मेटॅलिक मॅट टायटॅनियम सिल्व्हर, पर्ल मॅट शॅडो ग्रीन, पर्ल मून स्टोन ग्रे, मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू आणि मेटॅलिक मॅट ब्लॅक नंबर. 2 (4TX) रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
कंपनीने सुझुकी एवेनिस स्कूटरमध्ये 124.3 सीसी क्षमतेचे इंजिन दिले आहे. सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक इंजिन 8.7 पीएस पॉवर आणि 10 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करेल. यासोबतच, एसईपी आणि अॅडव्हान्स फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान देखील दिले आहे.
तर सुझुकी बर्गमन स्कूटरमध्ये 124 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक इंजिन देखील आहे. या इंजिनसह, स्कूटरला 8.7 पीएसची पॉवर आणि 10 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल. यामध्ये देखील SEP तंत्रज्ञानासोबत इको परफॉर्मन्स अल्फा इंजिन तंत्रज्ञान, ऑटो स्टॉप/स्टार्ट, सायलेंट स्टार्टर सिस्टम यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.