फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत ज्या उत्तम कार ऑफर करत असतात. त्यातीलच एक महत्वाची कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटाने भारतात ग्राहकांच्या मागणीला समजून नेहमीच उत्तम कार ऑफर करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच तर ग्राहक देखील नवीन कार खरेदी करताना टाटा मोटर्सच्या कारला पहिले प्राधान्य देत असतात. कंपनीने आता पर्यंत अनेक उत्तम कार लाँच केल्या आहेत. आता कंपनी Tata Curvv चे ब्लॅक एडिशन मार्केटमध्ये आण्याच्या तयारीत आहे.
March 2025 मध्ये कार खरेदी करण्याची सुवर्ण संधी, Tata Cars वर मिळतोय भरघोस डिस्काउंट !
भारतीय बाजारपेठेत, अनेक सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या व्हर्जनसह कार विकल्या जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स लवकरच त्यांची कूप एसयूव्ही टाटा कर्व्ह नवीन व्हर्जनसह लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी एसयूव्हीची नवीन व्हर्जन कधीपर्यंत लाँच करू शकते? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा कडून कूप एसयूव्ही म्हणून ऑफर केलेली टाटा कर्व्ह लवकरच भारतीय बाजारात नवीन व्हर्जनसह लाँच केली जाऊ शकते. परंतु, टाटाकडून अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
टाटा कर्व्हमध्ये 1.2 -लिटर इंजिन तसेच 1.5 -लिटर इंजिन देण्यात येईल. यासोबतच, हे एडिशन एसयूव्हीच्या व्हेरियंटमध्ये मॅन्युअल पेट्रोल, डीसीटी पेट्रोल, डिझेल मॅन्युअल आणि डिझेल डीसीटी ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध असेल.
रिपोर्ट्सनुसार, कंपनी हा एडिशन फक्त टाटा कर्व्हच्या टॉप व्हेरियंट Acomplished मध्ये देईल. याशिवाय, कोणत्याही अन्य व्हेरियंट्स सोबत या एडिशनला दिले जाणार नाही.
कर्व्ह डार्क एडिशनची नेमकी किंमत टाटा लाँचच्या वेळी जाहीर करण्यात येईल. परंतु टाटा कर्व्ह विथ डार्क एडिशनची एक्स-शोरूम किंमत नॉर्मल व्हर्जनच्या तुलनेत सुमारे 40 ते 50 हजार रुपयांनी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ही कार 16.5 लाख ते 19.5 लाख रुपयांपर्यंत एक्स-शोरूम किंमतीच्या आसपास आणता येईल.
कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही माहिती अधिकृतपणे सांगितलेली नाही. पण ही कार 22 मार्च 2025 पर्यंत भारतीय बाजारात लाँच केली जाऊ शकते.
टाटा मोटर्स त्यांच्या काही इतर एसयूव्ही डार्क एडिशनसह देखील ऑफर करते. कंपनीने डार्क एडिशनमध्ये टाटा नेक्सन, टाटा हॅरियर आणि टाटा सफारी सारख्या एसयूव्ही आणल्या आहेत.