फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. टाटा मोटर्स ही त्यातीलच एक. आजही मार्केटमध्ये एखादा ग्राहक कार खरेदी करण्यास जातो, तेव्हा त्याची पहिली पसंत ही टाटा मोटर्सच्याच कारलाच असते. ग्राहकांमध्ये असणारा हाच विश्वास मार्केटमध्ये कंपनीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे.
आता भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी टाटा मोटर्स 2025 च्या अखेरीस 5 नवीन SUV लाँच करणार आहे. यापैकी काही इलेक्ट्रिक असतील, तर काही पेट्रोल पॉवरट्रेनसह येतील. चला या एसयूव्हीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टाटा हॅरियर ईव्ही पहिल्यांदा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती आणि आता ती 3 जून 2025 रोजी लाँच होत आहे. यात 60 ते 75 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो, जो एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल. याचे एक्सटिरिअर सध्याच्या ICE हॅरियरसारखेच असेल, परंतु त्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि ADAS सारखे अॅडव्हान्स फीचर्स दिले जातील. मजबूत डिझाइन, चांगला स्पेस आणि लॉन्ग रेंज इलेक्ट्रिक एसयूव्ही शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हॅरियर ईव्ही हा एक उत्तम पर्याय ठरेल.
फेब्रुवारी 2025 मध्ये मिळाला फक्त 1 ग्राहक, अखेर Honda ला 11 वर्षांनंतर बंद केली ‘ही’ बाईक
टाटा हॅरियर पेट्रोल पहिल्यांदाच पेट्रोल इंजिनसह आणले जात आहे. आतापर्यंत ही एसयूव्ही फक्त डिझेल इंजिन पर्यायात उपलब्ध होती, परंतु आता तिला 1.5-लिटर 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. जुलै ते ऑगस्ट 2025 दरम्यान या कारचे लाँचिंग होऊ शकते. हा पर्याय विशेषतः अशा ग्राहकांसाठी असेल ज्यांना डिझेल नको आहे परंतु हॅरियरची मजबूत आणि आकर्षक स्टाइल आवडते.
टाटा सफारी पेट्रोल पहिल्यांदाच पेट्रोल इंजिनसह सादर केली जाणार आहे. टेस्टिंग दरम्यान ही कार अनेक वेळा पाहिली गेली आहे आणि त्यात 1.5-लिटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. हॅरियर पेट्रोल नंतर हे मॉडेल लाँच केले जाऊ शकते. सफारी पेट्रोल हा विशेषतः मोठ्या, पॉवरफुल आणि आरामदायी एसयूव्ही शोधणाऱ्या खरेदीदारांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
टाटा सिएरा आयसीई ही क्लासिक एसयूव्ही आहे, जी टाटा मोटर्स आधुनिक तंत्रज्ञान आणि स्टाइलसह पुन्हा सादर करणार आहे. त्यात 1.5-लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.0-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय असू शकतो. त्याचा लूक रेट्रो आणि फ्युचरिस्टिक दोन्हीचे कॉम्बिनेशन आहे. ही एसयूव्ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 दरम्यान लाँच केली जाऊ शकते.
30 हजाराच्या पगारात बरोबर फिट होतेय ‘ही’ कार, असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
टाटा सिएरा ईव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील तयार केली जात आहे, जी हॅरियर ईव्ही सारखे बॅटरी सेटअप वापरेल. यात 60 ते 75 किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल. हे मॉडेल हायटेक फीचर्स, कमी देखभाल आणि लांब पल्ल्यासह ईव्ही सेगमेंटमध्ये एक नवीन स्टायलिश आणि शक्तिशाली पर्याय बनू शकते.