भारतीयांना TATA Punch ची भुरळ, आर्थिक वर्ष 25 मध्ये ठरली पहिल्या क्रमांकाची कार
हाय स्टान्स, हाय ग्राऊंड क्लीअरन्स आणि लक्षवेधक ड्रायव्हिंग पोझीशनसह पंच आकर्षक स्टायलिश एसयूव्ही आहे, जी ऍडव्हेंचर ड्रायव्हिंगचा अनुभव देते. ही कार भारतातील विविध प्रदेश सहजपणे नेव्हिगेट करते. याच कारणामुळे ही कार शिखरामधून नेव्हिगेट करणारी पहिली फ्रण्ट-व्हील ड्राइव्ह एसयूव्ही ठरली आहे. तेथील तीव्र ग्रेडिएण्ट्समधून मार्ग काढत या कारने जगासमोर आपली एसयूव्ही क्षमता दाखवून दिली आहे.
पंचला लाँच करण्यापूर्वी प्रख्यात जीएनसीएपीकडून या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले होते. ऑगस्ट 2022 मध्ये टाटा पंच अवघ्या १० महिन्यांत १ लाख विक्रीचा टप्पा गाठणारी पहिली एसयूव्ही बनली होती. त्यानंतर या कारने पुढील ९ महिन्यांमध्ये २ लाख विक्रीचा टप्पा गाठला आणि पुढील ७ महिन्यांमध्ये ३ लाख विक्रीचा टप्पा गाठला होता. चला या कारच्या विक्रीतील वाढीबद्दल जाणून घेऊया.
सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये वार्षिक ७५ टक्क्यांची मोठी वाढ दिसण्यात आली, जेथे आर्थिक वर्ष २४ मध्ये टाटा पंच अग्रस्थानी होती. तसेच या कारने ६८ टक्के मार्केट शेअर वर आपली पक्कड निर्माण केली आहे. ९०-डिग्री डोअर ओपनिंग, सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये प्रमाणित वैशिष्ट्य म्हणून इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रेन सेन्सिंग वायपर्स आणि १८७ मिमीचे सर्वोच्च ग्राऊंड क्लीअरन्स अशा जबरदस्त फीचर्ससह नवीन पंच आज देशातील प्रीमियर सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही बनली आहे.
Punch ev ने ईव्ही उत्साहींचे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतले आहे. तसेच पंच ब्रँडच्या एकूण विक्री वाढीमध्ये अतिरिक्त 15 टक्क्यांचे योगदान दिले आहे. या कारचे 21 टक्के ग्राहक हे पहिले कारमालक आहेत. ही कार जलदपणे 13,000 विक्रीचा टप्पा गाठणारी ईव्ही बनली आहे आणि बाजारपेठांमध्ये प्रगती करत आहे. तसेच या कारने भारतीय कार मार्केटमध्ये ईव्ही बद्दलची जागरूकता वाढवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.