फोटो सौजन्य: Social Media
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील अग्रणी आणि भारतातील ईव्ही क्रांतीचे पुरस्कर्ते टाटा.ईव्ही इलेक्ट्रिक मोबिलिटीविषयीचे गैरसमज दूर करण्यात देखील आघाडीवर आहेत. हे गैरसमज दूर होऊन या वाहनांचा जास्तत जास्त वापर व्हावा आणि अधिकाधिक लोकांसाठी तो भविष्यासाठी सज्ज असलेला पर्याय बनावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
ईव्ही विषयीचा एक मोठा गैरसमज हा आहे की, त्यांची रेंज मर्यादित असते. नेक्सॉन.ईव्ही ४५ आणि कर्व्ह.ईव्ही या आपल्या उत्पादनांद्वारे टाटा.ईव्ही ने या चिंतेचे निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ४८९-५०२ किमी (पी१+पी२) आणि ३५०-४२५ किमी सी७५ ची प्रभावी एआरएआय-प्रमाणित रेंज सादर केली आहे. ही दोन्ही मॉडेल्स जलद चार्जिंगला समर्थन देतात, जी ४० मिनिटांत २०-८०% चार्ज होतात. कर्व्ह.ईव्ही हे मॉडेल तर ७०केडब्ल्यू + चार्जरचा उपयोग करून १५ मिनिटांत १५० किमी पर्यंत रेंज वाढवते.
कंपनीला ग्राहकांच्या वर्तनात देखील एक बदल दिसत आहे. २०२४ मध्ये ४७% ग्राहकांनी दररोज ७५ किमी. पेक्षा जास्त ड्रायव्हिंग केले. २०२० मध्ये हे प्रमाण फक्त १३% होते. यावरून सर्वसामान्य समजाला छेद मिळाला की ईव्ही फक्त शहरातल्या शहरात प्रवास करण्यासाठीच उपयुक्त आहेत.
फक्त बुलेट नाही तर ‘या’ बाईक्समध्ये सुद्धा मिळते पॉवरफुल इंजिन, स्टायलिश लूक आणि फीचर्सने सुसज्ज
आणखी एक समज हा आहे की ईव्ही त्यांच्या समकक्ष आयसीई वाहनांपेक्षा खूपच महाग असतात. परंतु टाटा.ईव्हीने लोकलाईझेशन आणि तांत्रिक प्रगतीचा उपयोग करून हे अंतर यशस्वीरित्या मिटवले आहे आणि कर्व्ह.ईव्ही आणि नेक्सॉन.ईव्ही या गाड्या बाजारातल्या आघाडीच्या आयसीई वाहनांच्या समकक्ष किंमतीत सादर केल्या आहेत.
किफायतशीर असण्याबरोबरच ईव्ही मूलतःच ऑटोमॅटिक आहेत आणि कमी आवाज करणाऱ्या असून अधिक दमदार आहेत, उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या आहेत आणि त्यांच्या देखरेखीचा खर्च देखील कमी आहे. याचे कारण हे आहे की, पारंपरिक आयसी पॉवरट्रेन्सच्या तुलनेत त्यांच्यात हालचाल करणारे भाग संख्येत कमी आहेत.
पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत ईव्हीचा ग्राहक पाच वर्षात ४.२ लाख रु. पेक्षा जास्त पैसे वाचवू शकतो. त्यामुळे इलेक्ट्रिक मोबिलिटीचा मूल्य प्रस्ताव देखील मजबूत आहे.
येत्या फेब्रुवारीत Audi RS Q8 facelift भारतात होणार लाँच, किंमत तब्बल 2 कोटी रुपये !
ईव्ही सेगमेन्टमध्ये टाटा.ईव्ही नवीन सुरक्षा मानके स्थापित करत आहे. पंच.ईव्ही, नेक्सॉन.ईव्ही आणि कर्व्ह.ईव्ही या सर्व वाहनांना बीएनसीएपीकडून आकर्षक ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. सहा एअरबॅग, आयपी६७-रेटेड वॉटरप्रूफ व डस्ट-प्रूफ मोटर्स आणि प्रगत लेव्हल-२ एडीएएस टेक्नॉलॉजी यांसारख्या फीचर्ससह ही सर्व वाहने चालक आणि प्रवासी यांच्या सुरक्षेला प्राधान्य देतात.
ईव्हीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी कंपनीने देशभरात सहा ईव्ही-एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि तीन समर्पित सर्व्हिस सेंटर्स लॉन्च केली आहेत. ईव्हीचा अवलंब करण्यातील अडथळे दूर करून आणि ग्राहकाच्या मनातील सामान्य गैरसमज दूर करून ईव्हीना मुख्य प्रवाहात आणण्याबाबत टाटा.ईव्ही वचनबद्ध आहे.