फोटो सौजन्य: Freepik
आज भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्राची भरभराट होत आहे. रोज अत्याधुकी फीचर्स असणाऱ्या गाड्या भारतीय मार्केटमध्ये लाँच होत आहे. यामुळे ग्राहक सुद्धा फक्त गाडीच्या मायलेजला प्राधान्य न देता अन्य फीचर्सवर सुद्धा लक्षकेंद्रित करत आहे. यातच आता अनेक वाहन उत्पादक कंपनीज आपल्या कार्सच्या इंजिनवर विशेष लक्ष देत आहे.
कुठल्याही गाडीसाठी, मग ती कार,बाईक किंवा ट्रक असो, या सर्व गाड्यांमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचे इंजिन. गाडीच्या इंजिनबद्दल जेव्हा सुद्धा चर्चा होते तेव्हा CC, BHP, Nm आणि RPM बद्दल आपण नेहमी ऐकतो. पण या सर्वांचे इंजिन मध्ये काय काम असते हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया याबद्दल.
कोणत्याही कारची इंजिन क्षमता ही सीसी मध्ये दर्शविली जाते. CC चा फुल्ल फॉर्म हा क्युबिक कपॅसिटी असा आहे. इंजिनचा सीसी जितका जास्त असेल तितका त्याचा सिलेंडर मोठा असेल. सामान्य वाहनांच्या तुलनेत जास्त सीसीच्या वाहने इंधन जास्त वापरते.
तुम्ही या प्रकारे देखील समजू शकता, जर एका कारची इंजिन क्षमता दोन लिटर आणि दुसऱ्या इंजिनची क्षमता दीड लीटर असेल, तर दोन लिटर क्षमतेच्या कारमध्ये 2000 सीसी आणि दीड लिटर क्षमतेच्या कारचे इंजिन 1500 सीसीचे इंजिन बसवले असेल.
BHP चा फुल्ल फॉर्म ब्रेक हॉर्सपॉवर असा आहे. इंजिनमधील पॉवर दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. छोट्या कार्समध्ये 100 ते 120 bhp ची कमाल पॉवर मिळते. त्याच वेळी, मध्यम आकाराच्या कारमध्ये 120 ते 200 bhp ची पॉवर दिली जाते आणि सुपरकार आणि उच्च कार्यक्षमता असलेल्या कार्समध्ये अधिक bhp पॉवर दिली जाते. वाहनात जितके जास्त बीएचपी असेल तेवढ्याच वेगाने ती कार धावण्याची क्षमता असते. यात टॉर्क देखील महत्त्वाची भूमिका बजावतो.
वाहनांमध्ये, टॉर्क न्यूटन मीटर म्हणजेच Nm मध्ये मोजला जातो. फिज़िक्सच्या दृष्टिकोनातून समजून घेतल्यास, या शक्तीचे काम एखाद्या वस्तूला वाकवणाऱ्या किंवा फिरवणाऱ्या फोर्सच्या वापराने होते. हे सांगते की कार खेचण्यासाठी इंजिनची किती पॉवर आहे.
जेव्हा आपण कार सुरू करतो आणि त्याचा वेग वाढवतो तेव्हा एक फोर्स निर्माण होते, ज्याच्या मदतीने इंजिन वाहन कारला चालू करण्यास सक्षम होते. या दरम्यान तुम्हाला जो धक्का जाणवतो त्याला टॉर्क म्हणतात.
RPM चा फुल्ल फॉर्म Revolutions per minute असा आहे. आरपीएम इंजिनमधील क्रँकशाफ्ट एका मिनिटात किती वेळा फिरत आहे हे सांगते. कारच्या इंजिनमध्ये 1 मिनिटात पिस्टन किती वेळा वर आणि खाली सरकतो ते देखील RPM म्हणून पाहिले जाते. जास्त RPM म्हणजे इंजिन जास्त पॉवर जनरेट करेल.






