फोटो सौजन्य: Social Media
सध्या भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बाईक्स लाँच होत आहे. बाइकची वाढती मागणी पाहता अनेक बाईक उत्पादक कंपनीज आपल्या ग्राहकांसाठी उत्तोमोत्तम बाइक लाँच करत आहे. या बाईक्स फक्त दिसण्यापुरत्या चांगल्या नसून त्यांच्या परफॉर्मन्सवर सुद्धा कंपनीकडून लक्ष केंद्रित केले जात आहे.
बाईक सेगमेंटमध्ये, टीव्हीएस कंपनीचा चांगलाच दबदबा आहे. आता लवकरच कंपनी एक नवीन बाईक मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बाईक 16 सप्टेंबर रोजी लाँच केली जाईल. ही पूर्णपणे नवीन बाईक असेल की अपडेटेड TVS Apache RR310 अपडेट करून ती अपडेट केली जाईल? चला जाणून घेऊया
TVS ने माहिती दिली आहे की ही नवीन बाईक 16 सप्टेंबर रोजी भारतात लाँच केली जाईल. माहितीनुसार, 16 सप्टेंबरला दुपारी 3.30 वाजेपर्यंत नवीन बाइक लाँच केली जाईल. विशेष म्हणजे या बाईकचे वर्ल्ड प्रीमियम केले जाणार आहे.
हे देखील वाचा: दमदार MG Windsor EV झाली लाँच, फीचर्सपासून आणि किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्व काही
TVS कडून एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यामध्ये थायलंड चांग सर्किट येथे ताशी 215.9 किलोमीटर वेगाने 1:49:742 सेकंदाचा सर्वोत्तम लॅप बनवण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर अशी अपेक्षा केली जात आहे की कंपनी 16 सप्टेंबरला TVS Apache RR310 बाईकची अपडेटेड व्हर्जन आणू शकते.
कंपनीने अद्याप कोणती बाईक वर्ल्ड प्रीमियर होईल याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु रिपोर्ट्सनुसार अपडेटेड RR310 चे डिझाईन अनेक कॉस्मेटिक बदलांसह सध्याच्या बाईक सारखे असू शकते. ज्यामध्ये नवीन ग्राफिक्स, पेंट स्कीम आणि ब्लॅक आऊट एक्झॉस्ट सिस्टम आढळू शकतात. यासोबतच या बाईकमध्ये अनेक चांगले फीचर्स देखील पाहायला मिळू शकतात. ज्यात डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस, क्रूझ कंट्रोल, विली कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल यांचा समावेश आहे.
TVS Apache RR310 च्या सध्याच्या व्हर्जनमध्ये 312.2 cc चार स्ट्रोक, चार वाल्व, सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन आहे. यामुळे बाईकला स्पोर्ट आणि ट्रॅक मोडमध्ये 34 पीएस पॉवर आणि 27.3 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. तर शहरी आणि रेन मोडमध्ये 25.8 पीएस पॉवर आणि 25 न्यूटन मीटरचा टॉर्क उपलब्ध आहे. यात सिक्स स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. अशी अपेक्षा आहे की, हेच इंजिन अपडेट व्हर्जनमध्ये वापरण्यात येईल.
कंपनीकडून सध्याच्या TVS Apache RR310 ची एक्स-शोरूम किंमत 2.50 लाख ते 2.72 लाख रुपयांच्या दरम्यान असेल. पण अपडेटेड व्हर्जनच्या एक्स-शोरूम किमतीत थोडी वाढ होऊ शकते.