फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक जण बाईक्स वापरताना दिसतात. त्यातही हल्ली स्पोर्टी आणि एडव्हेंचर बाईक्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पूर्वी बाईक घेताना किंमत या एकाच गोष्टीकडे पाहिले जायचे पण आता बाईक घेताना त्याचा लूक आणि डिझाइन या दोन्ही गोष्टीकडे पाहिले जाते. म्हणूनच आता अनेक दुचाकी कंपनी आकर्षक लुकसह दमदार परफॉर्मन्स असणाऱ्या बाईक्स लाँच करत आहे. आता टीव्हीएस सुद्धा नवीन ॲडव्हेंचर बाईक आणायच्या तयारीत आहे.
भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम बाईक्स ऑफर करणारी देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक TVS मोटर्स लवकरच एक नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपला पोर्टफोलिओ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. रिपोर्ट्सनुसार, या क्रमात एक नवीन बाईक सादर केली जाऊ शकते. कंपनी कोणत्या सेगमेंटमध्ये नवीन बाईक आणू शकते, त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
Kia Carnival च्या विक्रीला अच्छे दिन! दोन महिन्यात विकले ‘एवढे’ युनिट्स
मीडिया रिपोर्ट्सनुसार, TVS लवकरच भारतीय बाजारात नवीन बाईक लाँच करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीकडून ॲडव्हेंचर सेगमेंटमध्ये एक नवीन बाईक लाँच केली जाऊ शकते. मात्र, या संदर्भात कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण टेस्टिंग दरम्यान बाईक स्पॉट झाली आहे.
TVS ची नवीन बाईक टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. स्पॉटेड युनिटमध्ये अनेक फीचर्स आणि डिझाइनची माहिती मिळाली आहे. TVS ची नवीन बाईक सेमी फेअरिंगसह आणली जाईल. बाईकला डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर प्रदान केले जाईल, जे नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल, राइड ॲनालिटिक्स, 19 इंच अलॉय व्हील, LED लाईट्स, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक यांसारख्या अनेक फीचर्ससह प्रदान केले जातील.
मिळालेल्या माहितीनुसार, TVS कडून नवीन 300 cc RT-XD4 इंजिन दिले जाऊ शकते. याला 312.12 cc क्षमतेचे नवीन इंजिन दिले जाऊ शकते, जे कंपनीने डिसेंबर 2024 मध्ये आयोजित Motosol येथे प्रदर्शित केले आहे. या इंजिनमधून बाईकला 35.45 पीएस पॉवर आणि 28.5 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळू शकतो. बाईक 6 स्पीड गिअरबॉक्ससह आणली जाऊ शकते. याशिवाय ड्रायव्हिंगसाठी अनेक राइडिंग मोड्सचा पर्यायही दिला जाऊ शकतो.
TVS ने या बाईकबद्दल कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन बाईक कंपनी 2025 च्या मध्यापर्यंत बाजारात लाँच करू शकते.
नवीन बाईक TVS तर्फे ॲडव्हेंचर सेगमेंटमध्ये आणली जाईल. या सेगमेंटमध्ये ती KTM, Royal Enfield, Hero, Triumph सारख्या कंपन्यांच्या साहसी बाइक्सशी थेट स्पर्धा करेल.