सामान्यांना झोंबली बजेटची मिरची! रिलस्टारने अर्थमंत्र्यांना केले खतरनाक ट्रोल, VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Feat वसूली ताई…! Budget 2026 जाहीर होताच नेटकऱ्यांनी अर्थमंत्र्यांना घेरलं, मजेदार MEMES VIRAL
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिलेनमे सांगितले आहे की, तुम्हाला बजेट तयार करायचे असेल यासाठी एक खास रेसिपीची गरज आहे. यासाठी सर्वात पहिल्यांदा घरातलं एक चौथं सर्वात मोठं पातेल घ्या. यातून तिने सांगितले आहे की, भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. यानंतर ती म्हणते की आपण आता बजेटची चटणी बनवूयात. चटणीला फोडणी देण्यासाठी मध्यमवर्गीयांचे रक्त आणि घाम घ्या. यामुळे बजेटला जास्त चव येईल. तिची ही टीका नेटकऱ्यांच्या अत्यंत पसंतीस पडली आहे. यामध्ये महिला बजेटमध्ये कोणते मसाले टाकायचे, फोडणी केवढी झणझणीत द्यायची अशी टीका शैलीत तिने सांगितेल आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.
व्हायरल व्हिडिओ
“Nafrat ki chashni” – magic masala, ingredient that works it’s magic before festivals and every election. Brilliant take on #Budget by @Kabiran_ PS~New ingredient added-Skilling. pic.twitter.com/fmNXNutk19 — Vini Kohli (@vinikkohli) February 1, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @vinikkohli या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हास्याचा इमोजी शेअर करत दीदी तू अगदी मनातलं बोललीस अशी प्रतिक्रिया दिली आहे. या बजेटवर सोशल मीडियावर मीम्स देखील तुफान व्हायरल होत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






