भाजप खासदार नारायण राणे यांनी उपशाखाप्रमुखाला ठार मारण्याची दिली धमकी बाळासाहेब ठाकरेंनी थांबवलं (फोटो - सोशल मीडिया)
Narayan Rane : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत असून भाजपचे स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी राजकीय नेत्यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. सध्या भाजप नेते आणि खासदार नारायण राणे हे चर्चेमध्ये आले आहेत. नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी सांगत एक किस्सा सांगितला आहे. त्याचबरोबर एका कार्यक्रमामध्ये निवृत्तीबाबत वक्तव्य केले.
निवडणुकीच्या प्रचारावेळी कणकवलीमध्ये केंद्रीय नेते नारायण राणे यांची सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्यांनी खून करण्याचे टाळले असल्याची कबुली दिली आहे. नारायण राणे म्हणाले की, “माझ्या एका मित्राने मला सांगितलं की तू आज बाहेर निघू नको. रस्त्याच्या बाजूने जाऊ नको. नेहमीच्या रस्त्याने तू जाऊ नको. एकाने तुझी टीप दिली आहे. टीप देणाऱ्याचे नाव मला माहित आहे. असं सांगताच मी त्यांना बोललो की मी लगेच येतो. मी लगेच गाडी काढली आणि लगेच त्या माणसाच्या घरी गेलो. मी थेट त्या माणसाच्या घरी गेलो आणि दरवाजा नॉक केला. त्या उपशाखाप्रमुखाच्या पत्नीने दरवाजा उघडला मी त्यांना थेट सांगितलं की मी तुझ्या पतीला ठार मारणार आहे,” असा किस्सा नारायण राणे यांनी भरसभेमध्ये सांगितला.
हे देखील वाचा : स्वच्छ शहराचा मुखवटा पडला गळून; इंदूरच्या दुषित पाणी प्रकरणाने वास्तव आले जगासमोर
पुढे ते म्हणाले की, “दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेब ठाकरेंनी बोलावलं, मी तिथे गेलो. तिथे मला तो उपशाखाप्रमुख बसलेला दिसून आला. बाळासाहेब मला म्हणाले की तु या उपशाखाप्रमुखाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला बोलला त्याला ठार मारणार म्हणून? तर मी म्हणालो हो मी याला ठार मारणार…यावर पत बाळासाहेब ठाकरे म्हणाले की मी तुला विचारत आहे यावर तु परत मी याला मारणार असं म्हणतोय. मी म्हणलो, या माणसाने दाऊतच्या माणसाला माझी टीप द्यायचं ठरवलं आहे. मी त्याला जीवतं ठेवलं तर तो मला मारणार. मी मरणार. त्यापेक्षा मी याला मारलं तर मी जगणार,” असं नारायण राणे यांनी सांगितले.
हे देखील वाचा : जिंकण्यासाठी साम,दाम.दंड,भेद…! ठाकरेंच्या उमेदवाराला पोलीस घेऊन एकनाथ शिंदेंच्या घरी, Video आला समोर
यानंतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, “नारायण मी तुला एक विनंती करू का. मी तुला सांगतो, तू त्याला जीवनदान देऊ शकतोस का? मी म्हणालो साहेब तुम्ही जे सांगाल ते होईल. बाळासाहेबांनी सांगितलं म्हणून मी त्याला जीवनदान दिलं”, असा किस्सा खासदार नारायण राणे यांनी भरसभेमध्ये सांगितला.
नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत?
नारायण राणे यांनी भाषणामध्ये आपल्या निवृत्तीचे संकेत देखील दिले आहेत. ते म्हणाले की, “मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मी लोकसेभवर जाण्याआधी सुद्धा मला तिकीट नको असे सांगितलं होतं. मात्र नड्डा यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला राजकारणातून सोडणार नाही. मी घमेंडखोर आहे. मी कोणापेक्षा कमी आहे असं कधीच मानत नाही मला त्याचा अभिमान वाटतो. मात्र आता कुठेतरी थांबायला पाहिजे. राणेंना संपवायला निघाले त्यांना सांगतो, राणे पुरून उरला आहे. माझी रास गुरु आहे. ती स्ट्रॉग आहे. मी कार्यकर्त्यांना सांगायला आलो आहे की राणे संपणार नाही कुटुंब म्हणून राणे कुटुंब एकत्र राहणार आहोत,” अशा शब्दांत नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.






