फोटो सौजन्य - Social Media
Volvo Cars India : पुण्यातील Volvo Cars India चे अधिकृत डीलर फ्लाइगा वोल्वो कार्स पुणे यांनी एकाच वेळी 11 आलिशान Volvo XC90 गाड्यांची डिलिव्हरी करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात या लक्झरी एसयूव्हींच्या किल्ल्या शिवम असोसिएट्सचे संस्थापक आणि सीएमडी डॉ. शिवानंद एस. नीलन्नवर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. पुण्यातील लक्झरी वाहन बाजारासाठी हा सोहळा विशेष ठरला असून, एकाच वेळी झालेल्या सर्वात मोठ्या Volvo XC90 डिलिव्हरींपैकी ही एक मानली जात आहे.
शिवम असोसिएट्सच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीतील प्रमुख सदस्यांना या लक्झरी कार्स भेट म्हणून देण्यात आल्या. संस्थेच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. कंपनीसोबत दीर्घकाळ निष्ठेने काम करणाऱ्या सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. या विशेष कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर तसेच अनेक पाहुण्यांची उपस्थिती लाभली होती.
फ्लाइगा वोल्वो कार्स पुणे यांच्या या डिलिव्हरी कार्यक्रमाने शहरातील लक्झरी कार क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केला आहे. सुरक्षितता, प्रीमियम आराम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाणारी Volvo XC90 ही एसयूव्ही ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. स्कँडिनेव्हियन डिझाइन, आकर्षक इंटेरियर आणि अत्याधुनिक फीचर्समुळे ही कार लक्झरीचा नवा अनुभव देते. त्यामुळे विशेष प्रसंग, व्यावसायिक यश आणि प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून XC90 कडे पाहिले जाते.
या डिलिव्हरीमुळे वोल्वो ब्रँडची पुण्यातील वाढती लोकप्रियता पुन्हा अधोरेखित झाली आहे. लक्झरी वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे शहरातील ऑटोमोबाईल बाजार अधिक वेगाने विस्तारत असल्याचेही या प्रसंगातून दिसून आले. फ्लाइगा वोल्वो कार्स पुणे यांनी ग्राहकांचा विश्वास आणि समाधान यांना प्राधान्य देत भविष्यातही अशाच विशेष सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.






