फोटो सौजन्य: Freepik
ऑटोमोबाइल हे भारतातील एक महत्वाचे क्षेत्र आहे. भारताच्या विकासात हे क्षेत्र नेहमीच महत्वाची भूमिका बजावत आलं आहे. रोजगारनिर्मितीची प्रमुख स्रोत म्हणून सुद्धा या क्षेत्राकडे पहिले जाते. यामुळेच यंदाच्या बजेटमध्ये अनेक नागरिकांचे लक्ष या क्षेत्रासंबंधित घोषणेकडे होते. मोदी सरकारने सुद्धा अनेक महत्वपूर्ण घोषणा ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी केल्या आहेत. जाणून घेऊयात या घोषणांबद्दल.
स्वस्त होणार Electric Cars
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात देशातील लिथियमच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. याचा थेट फायदा इलेक्ट्रिक वाहनांना होऊ शकतो. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीमध्ये लिथियमचा वापर केला जातो. देशात लिथियम स्वस्त केले तर त्याचा परिणाम इलेक्ट्रिक कार्सच्या किंमतीवरही होईल.
नवीन Expressway बनवले जाणार
अनेक राज्यांमधील रोड कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 2024 च्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले की, उत्तर-पूर्व राज्यांमध्ये तीन नवीन एक्स्प्रेस वे बांधले जातील. यामध्ये पाटणा ते पूर्णिया दरम्यान नवीन एक्स्प्रेस वे बांधण्यात येणार आहे. बक्सर आणि भागलपूर दरम्यान एक नवीन एक्स्प्रेस वे देखील बांधला जाईल. वैशाली ते बोधगया एक्सप्रेस वे लाही मंजुरी देण्यात आली आहे. बक्सरमधील गंगा नदीवर 26 हजार कोटी रुपये खर्चून अतिरिक्त दोन लेन असणारा पूल बांधण्यात येणार आहे.
ग्राम सडक योजनेतील चौथा टप्पा सुरु करण्यात येणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा चौथा टप्पाही सुरू केला जाईल. त्याअंतर्गत २५ हजार ग्रामीण वस्त्यांना उच्च दर्जाचे रस्ते दिले जाणार आहेत.