फोटो सौजन्य: Freepik
पूर्वी एखाद्या व्यक्तीकडे कार असणे ही खूप प्रतिष्ठेची बाब मानली जायची. अनेकांना कार विकत घेणे परवडायचे नाही, जेणेकरून बहुतेक जणं बस किंवा ट्रेनचे धक्के खात प्रवास करायचे. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज फक्त श्रीमंतांकडेच नाही तर मध्यम वर्गीय व्यक्तीकडे सुद्धा कार पाहायला मिळते
हल्ली बदलत्या काळानुसार कार्स सुद्धा बदलत चालल्या आहेत. अनेक कार्स मध्ये आधुनिकता आली आहे. यातीलच एक आधुनिकता म्हणजे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. हल्लीच्या काही कारमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पाहायला मिळते. जर तुम्ही महिला कार चालक असाल तर ही बातमी आवर्जून वाचा. कारंज आज आपण जाणून घेणार आहोत, महिलांसाठी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणारी कार सोयीस्कर की मॅन्युअल गिअरबॉक्स असणारी?
ज्या महिला नुकत्याच ड्रायविंग शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. हे त्यांना रस्त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि रहदारीबद्दल कमी काळजी करण्यास मदत करेल. तसेच, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स त्यांची ड्रायव्हिंग अधिक सुरळीत व आरामदायी बनवेल.
महिला ड्रायव्हरला ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव असेल आणि तिला गाडीवर पूर्ण नियंत्रण ठेवायला आवडत असेल, तर मॅन्युअल कारही एक चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु, जर एखादी महिलेचा रहदारीमध्ये बराच वेळ जात असेल तर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अधिक सोयीस्कर होईल.
बहुतेक महिलांसाठी, विशेषत: ज्यांना शहरातल्या ट्रॅफिकमध्ये कार चालवायचे आहे किंवा अधिक आरामदायी आणि सोपा ड्रायव्हिंगचा अनुभव हवा आहे, त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स एक चांगला पर्याय ठरू शकतो. तथापि, ड्रायव्हिंगचा आनंद घेणाऱ्या आणि कारवर अधिक नियंत्रण हवे असलेल्या ड्रायव्हरसाठी मॅन्युअल गिअरबॉक्स देखील एक उत्तम पर्याय असू शकतो.
सध्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसत आहे, कारण तो आरामदायी, सोयीस्कर आणि सोपा ड्रायव्हिंगचा अनुभव देतो, जो आजच्या व्यस्त जीवनशैलीला अनुकूल आहे.
ऑटोमॅटिक कारमध्ये तुम्हाला गिअर्स वारंवार बदलण्याची गरज नाही. यात आपोआप गिअर्स बदलते, तसेच हेव्ही ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग अधिक आरामदायी आणि तणावमुक्त होते.
मॅन्युअल गिअरबॉक्स ड्रायव्हरला कारवर अधिक नियंत्रण देतो, विशेषत: जास्त वेगाने किंवा हिल स्टेशनसारख्या ठिकाणी. ज्यांना ड्रायव्हिंगचा अनुभव आवडतो त्यांच्यासाठी हे चांगले असू शकते.