फोटो सौजन्य: Freepik
काळानुसार भारतातील वाहनांची मागणी वाढत आहे. पण आजही नवीन कार खरेदी करताना, पेट्रोल इंजिन असलेली कार खरेदी करावी की डिझेल इंजिन असलेली कार घरी आणावी, हा प्रश्न अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला कारच्या इंजिनपासून ते परफॉर्मन्स आणि मायलेजपर्यंतच्या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिन कारमध्ये कोणती कार चांगली आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
जर आपण पेट्रोल आणि डिझेल इंजिन कारमधील फ्युएल एफिशियंसीबद्दल बोललो तर डिझेल कार पेट्रोलपेक्षा जास्त मायलेज देते. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कार इंधनाचा वापर कमी करते.
पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत डिझेल इंजिन इथे सुद्धा बाजी मारते. डिझेल इंजिन असणाऱ्या वाहनांचा आउटपुट टॉर्क देखील पेट्रोल इंजिनच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे डिझेल इंजिनच्या गाड्या जड माल वाहून नेण्यात अधिक किफायतशीर असतात. तसेच डिझेल इंजिनच्या कार अगदी उतारावरही सहज चालवता येतात.
डिझेल किंवा पेट्रोल इंजिन असलेली कार खरेदी करण्यापूर्वी, या दोन्ही इंजिन पैकी कोणते इंजिन किफायतशीर ठरेल हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. कोणतीही नवीन कार खरेदी करण्यासोबतच ती नवीन कार अनेक खर्च देखील घेऊन येते. मग ते कार मेंटेनन्स असो की तिला चालवण्यासाठी लागणारे इंधन. आपण सर्वेच जाणतो, भारतात पेट्रोलपेक्षा डिझेल स्वस्त आहे.
दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण पाहता, आपण पर्यावरणातील प्रदूषण कमी केले पाहिजे. जर आपण पेट्रोल आणि डिझेल कारमधून होणाऱ्या प्रदूषणाबद्दल बोललो तर डिझेल कारमुळे अधिक प्रदूषण होते. डिझेल कार देखील नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर हानिकारक वायू अधिक उत्सर्जित करतात. यामुळे आपल्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. पर्यावरणाचा विचार केल्यास पेट्रोल कार डिझेल कारपेक्षा चांगले ठरतात.