फोटो सौजन्य: iStock
अनेकदा पेट्रोल पंपावर बाईकस्वार आपल्या बाईकमध्ये फुल्ल पेट्रोल भरताना दिसतात. त्यांना असं वाटतं की, जास्त पेट्रोल भरल्यामुळे बाईक अधिक काळ चालेल आणि तिचा परफॉर्मन्स देखील उत्तम राहील. मात्र, हे खरे नाही. तुम्ही जर तुमच्या बाइकची फ्युएल टाकी तिच्या निश्चित क्षमतेपेक्षा जास्त भरली, तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात.
सर्वप्रथम, अधिक पेट्रोल भरल्यामुळे टाकीला अतिरिक्त दबाव येतो, ज्यामुळे पेट्रोल टाकीमध्ये लिकेज होऊ शकते. यामुळे पेट्रोल गळण्याची शक्यता असते, ज्यामुळे वाया जाणारे इंधन आणि प्रदूषण होऊ शकते.
बाईक किंवा कोणत्याही वाहनात पेट्रोल आणि डिझेल भरताना हे लक्षात ठेवले पाहिजे की वाहनाची इंधन टाकी कधीही क्षमतेपेक्षा जास्त भरू नये. वाहनाच्या टाकीच्या क्षमतेपेक्षा जास्त इंधन टाकल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वाढते. असे का घडते यामागे अनेक कारणे आहेत. या कारणांबद्दल जाणून घेऊया.
ऑटोमेकर्स कोणत्याही वाहनाच्या इंधन टाकीची क्षमता 10 ते 15 टक्क्यांनी कमी करतात, जेणेकरून लोकं वाहन उत्पादकांनी सांगितलेल्या क्षमतेनुसार वाहनाची टाकी भरतात. समजा तुम्ही तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेला आहात आणि तुम्हाला पेट्रोल पंपावर टाकी भरण्यास सांगितले आहे. जेव्हा पेट्रोल पंप मालक बाइकची टाकी पूर्णपणे भरतो तेव्हा तुम्हाला कळते की इंधन टाकीची क्षमता 10 लीटर होती आणि सुमारे 11 लिटर पेट्रोल बाईकमध्ये गेले.तेव्हा समजते की क्षमतेपेक्षा जास्त पेट्रोल आपल्याला बाईकमध्ये कसे भरता येईल. यामागील कारण म्हणजे वाहन उत्पादक जाणूनबुजून इंधन टाकीची क्षमता कमी घोषित करतात, जेणेकरून लोक त्या मर्यादेपेक्षा जास्त टाकी भरू नयेत.
मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार eVitara चा टिझर रिलीज, Bharat Mobility 2025 मध्ये होऊ शकते सादर
पेट्रोल पंपाच्या अंडर ग्रॉउंड टाकीमध्ये साठवलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे तापमान वेगळे असते. जेव्हा बाहेरील वातावरणाचे तापमान देखील वेगळे असते. टँकरमधून पेट्रोल किंवा डिझेल बाहेर आल्यानंतर बाहेरील हवेच्या संपर्कात त्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे इंधन गळतीचा धोकाही वाढतो. त्यामुळे बाईक किंवा कारमध्ये क्षमतेपेक्षा कमी पेट्रोल किंवा डिझेल भरले जाते.
पेट्रोल किंवा डिझेलमधून बाहेर पडणाऱ्या वाफेलाही इंधन टाकीच्या आत व्हॅक्यूम आवश्यक असतो. टाकी पूर्ण भरल्यानंतर, पेट्रोलला ती व्हॅक्यूम मिळत नाही, ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता कमी होते आणि प्रदूषण देखील वाढते. बाईकची टाकी पूर्ण भरली असुन ती उभी करताना तिला वाकवून बाजूच्या स्टँडवर उभी केल्यास गळती होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे अपघाताचा धोका असतो.