मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणारा अटकेत (फोटो- सोशल मिडिया)
स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रकरणात एकाला अटक
आरोपी ठाकरेंच्याच कार्यकर्त्याचा भाऊ असल्याचे उघड
स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आलेला
Meenatai Thackeray Statue: राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. नेत्यांचे एकमेकांवर जोरदार आरोप सुरु असताना मुंबईमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता या प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. हे कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याने आपला गुन्हा कबूल केला असल्याचे समजते आहे.
मुंबईच्या शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना आज घडली होती. त्यानंतर राज्यभरतून संताप व्यक्त केला जात होता. शिवसनिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कोणीतरी हे मुद्दाम केल्याचा संशय निर्माण झाला होता. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कोणी हे कृत्य तर केले नाही ना अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. मात्र आता पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्याला अटक केली आहे.
Who is Meena Thackeray : कोण होत्या मीनाताई ठाकरे? शिवसैनिकांना त्यांनी दिली आईची माया
विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा उद्धव ठाकरे यांच्याच पक्षातील एका कार्यकर्त्याचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. संपत्तीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचे आरोपीने म्हटल्याचे समजते आहे. दरम्यान याच रागातून त्याने हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
अशा प्रकारची घटना निषेधार्हच आहे. ज्या कोणत्या समाजकंटकाने ही घटना केली असेल त्याला पोलिस शोधून काढतील. त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा त्याला राजकीय रंग देणे हे मला योग्य वाटत नाही.
काय म्हणाले खासदार अनिल देसाई?
कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजकंटक किंवा भेकडांच्या औलादीला कोणती संस्कृती, कोणते संस्कार झालेले नसतील. यांचा पोलिसांतर्फे शोध घेतला जात आहे. जे व्हायचं ते होईल, अशा प्रवृत्तींना पोलीस किंवा सरकारी यंत्रणा काय, आज तुमचे जे काही कर्तव्य आहे, ते नेमकं त्यावर काय चाललंय का, याचा निषेध करण्यापलीकडील या गोष्टी आहेत आणि त्यामुळे सरकार अपयशी ठरलं हे आपल्या प्रत्येक वेळी जाणवत आहे.