फोटो सौजन्य - Social Media
इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेड (IYM) ने राष्ट्रीय स्तरावर ‘Yamaha National 3S Grand Prix 2024–25’ स्पर्धेचं आयोजन केलं. ही कौशल्याधारित स्पर्धा यामाहाच्या देशभरातील डीलरशिपमधील कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आली होती. विक्री (Sales), सेवा (Service) आणि सुटे भाग (Spares) म्हणजेच ‘3S’ अनुभव अधिकाधिक प्रभावी बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान हा या स्पर्धेचा उद्देश होता.
यामाहा डीलरशिपमधील सेवा अधिक उत्तम बनवण्याच्या दिशेने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरली. या वर्षी एकूण पाच श्रेणी टेक्निशियन, सर्व्हिस सल्लागार, टेली-कॉलर (नवीन श्रेणी), पार्ट्स मॅनेजर आणि सेल्स कन्सल्टंट यामध्ये ७,५६७ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तीन टप्प्यांत ही स्पर्धा पार पडली. रीजनल राउंड (ऑगस्ट-सप्टेंबर २०२४), झोनल राउंड (फेब्रुवारी-मार्च २०२५) आणि अंतिम राष्ट्रीय स्पर्धा (मे २०२५).
सुरजपूर (ग्रेटर नोएडा) येथील यामाहाच्या प्रांगणात अंतिम राष्ट्रीय फेरी २४ आणि २५ जून रोजी पार पडली. यातून प्रत्येक श्रेणीतून टॉप ३ विजेते घोषित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे टेक्निशियन श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावणारा प्रतिनिधी नोव्हेंबर २०२५ मध्ये जपानमध्ये होणाऱ्या World Technician Grand Prix मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेत सहभागी कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन त्यांच्या संवाद कौशल्य, तांत्रिक ज्ञान, ग्राहक सेवा, तक्रार निवारण, स्टॉक व्यवस्थापन आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये सेवा देण्याच्या क्षमतेनुसार केलं गेलं.
यामाहा मोटर इंडिया सेल्सचे सीनियर वाईस प्रेसिडेंट श्री. रविंदर सिंग म्हणाले, “Yamaha National 3S Grand Prix हे यामाहा ब्रँडच्या उत्कृष्ट सेवेचं प्रतिक आहे. ही स्पर्धा आमच्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला चालना देत असून, ग्राहक अनुभव अधिक दर्जेदार कसा करायचा यावर आमचा भर आहे. आम्ही सर्व फायनलिस्ट्सचे अभिनंदन करतो आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विजेत्याला शुभेच्छा देतो.”