प्लास्टिक कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती! Avro India उभारणार देशातील सर्वात मोठा रिसायकलिंग प्लांट
AVRO Recycling Limited या Avro India Limited च्या 100 टक्के मालकीच्या सहाय्यक कंपनीअंतर्गत ही सुविधा कार्यरत आहे. येथे भारतातील सर्वात मोठा फ्लेक्झिबल प्लास्टिक रिसायकलिंग प्लांट असून, सध्या या प्लांटची प्रक्रिया क्षमता प्रति महिना 500 मेट्रिक टन इतकी आहे. आर्थिक वर्ष 2025 ते 2026च्या चौथ्या तिमाहीपर्यंत ही क्षमता वाढवून प्रति महिना 1,000 मेट्रिक टन करण्याचे नियोजन आहे.
आजपर्यंत या रीसायकलिंग प्लांटमध्ये करण्यात आलेला भांडवली खर्च ₹25 कोटी इतका आहे. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत आणखी ₹30 कोटींची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. दीर्घकालीन शाश्वततेच्या दृष्टिकोनातून, भविष्यात उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड रीसायकलिंग प्रकल्पांच्या माध्यमातून देशभरात आपले जाळे विस्तारण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
2002 साली स्थापन झालेली Avro India Limited ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण भारतभरातील घरे, व्यवसाय संस्था आणि शिक्षण संस्था यांना टिकाऊ, उच्च दर्जाचे आणि किफायतशीर प्लास्टिक मोल्डेड फर्निचर पुरवत आहे. आज या कंपनीला देशभरात मानाचे स्थान असून एनएसई आणि बीएसई या दोन्ही शेअर बाजारांमध्ये सूचिबद्ध आहे.
Avro ने देशातील सर्वात व्यापक वितरण जाळ्यांपैकी एक उभारले आहे, ज्यामध्ये 24 राज्यांतील 300 पेक्षा अधिक वितरक आणि 30,000 हून अधिक रिटेलर्सचा समावेश आहे.
Share Market Closed: ट्रम्पच्या टॅरिफ धमकीचा बाजारावर परिणाम! ‘या’ शेअर्सची सलग चौथ्या दिवशी घसरण
पूर्वीपासूनच सिमेंटच्या पिशव्या (गोण्या), मीठाच्या पिशव्या, साखरेच्या पिशव्या, पुट्टीच्या पिशव्या आणि कॅल्साइट पॅकेजिंग यांसारखा प्रक्रिया करणे कठीण असलेला प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर नॉन-रिसायकलेबल मानला जात असे. हा कचरा प्रामुख्याने डाउनसायकल केला जात असे किंवा असंघटित क्षेत्रात हाताळला जात असे. सुमारे तीन वर्षांचे सखोल संशोधन, चाचण्या आणि तांत्रिक नवकल्पना यांच्या आधारावर Avroने अशी स्वतंत्र तंत्रज्ञानाधारित सिस्टीम विकसित केली आहे, ज्या माध्यमातून अशा गुंतागुंतीच्या प्लास्टिक कचऱ्याचे मोठ्या प्रमाणावर अपसायकलिंग करता येते. या प्रणालीमुळे भारतात निर्माण होणाऱ्या अशा प्रकारच्या जवळपास 10 लाख मेट्रिक टन वार्षिक कचऱ्याचे जबाबदारीपूर्वक रिसायकलिंग करणे शक्य होणार आहे.
या कारखान्यात तयार होणारे रीसायकल्ड ग्रॅन्युल्स पूर्णपणे उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या निर्मितीत वापरले जातात. यामध्ये प्लास्टिक फर्निचर, एअर कूलर्स, वॉशिंग मशीन्स, ऑटोमोटिव्ह घटक तसेच इतर औद्योगिक आणि ग्राहकवर्गासाठीची उत्पादने यांचा समावेश आहे. हे ग्रॅन्युल्स व्हर्जिन प्लास्टिकपेक्षा 40% पर्यंत कमी किमतीत उपलब्ध असूनही आवश्यक तांत्रिक आणि टिकाऊपणाच्या निकषांची पूर्तता करतात. त्यामुळे उत्पादकांना खर्च नियंत्रित ठेवणे, नियमानुसार काम करणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्पादन करणे अधिक सोयीस्कर ठरते.
भारत सरकारने लागू केलेल्या विस्तारित उत्पादक जबाबदारी (ईपीआर) नियमांनुसार कडक प्लास्टिकमध्ये किमान 30 टक्के रीसायकल्ड प्लास्टिकचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च दर्जाचा रीसायकल्ड कच्चामाल उपलब्ध होण्यात मोठी तूट निर्माण झाली असून अनेक ब्रँड ओनर्सना पुरवठ्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. या महत्त्वाच्या आव्हानाला प्रतिसाद देत Avro India ही कंपनी फ्लेक्झिबल प्लास्टिक रीसायकलिंग क्षेत्रातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह संघटित कंपनी म्हणून उदयास आली आहे. औद्योगिक पातळीवर सातत्यपूर्ण प्रमाणात रीसायकल्ड कच्चा माल उपलब्ध करून देत ही कंपनी उद्योगांना सक्षम आणि शाश्वत उपाय उपलब्ध करून देत आहे.
Silver Import India: चांदी आयातीवर जीटीआरआयचा इशारा; म्हणाले की, चीनच्या वर्चस्वातून..
या घडामोडींबद्दल बोलताना Avro India Limited चे चेअरमन आणि होल-टाईम डायरेक्टर श्री. सुशील कुमार अग्गरवाल म्हणाले, “भारतासमोरील प्लास्टिकची समस्या वेगवेगळ्या आणि तुकड्या-तुकड्यांत केलेल्या प्रयत्नांनी सोडवता येणार नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम, योग्य तंत्रज्ञान आणि ठाम हेतू आवश्यक आहे. Avro मध्ये आम्ही अनेक वर्षे संशोधन करून अशी सिस्टीम विकसित केली आहे, ज्याद्वारे गुंतागुंतीचा प्लास्टिक कचरा मूल्यवर्धित कच्च्या मालात रूपांतरित करता येतो. आमचा दृष्टीकोन केवळ रीसायकलिंगपुरता मर्यादित नाही, तर देशभरात अशी इकोसिस्टम उभारण्याचा आहे, ज्यामध्ये कचऱ्याकडे एक संधी म्हणून पाहिले जाईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षणही केले जाईल.”
भविष्याचा विचार करता Avro India ही संपूर्ण देशभर मुख्य आणि उप-रीसायकलिंग प्रकल्पाचे जाळे उभारण्याच्या दिशेने काम करत आहे, ज्यामुळे कचरा प्रक्रियेचे विकेंद्रीकरण होईल आणि भारताची सर्क्युलर इकोनॉमीकडे वाटचाल अधिक वेगाने पुढे जाईल. नवकल्पना, मोठ्या प्रमाणावर कामकाज आणि सहकार्य यांच्या माध्यमातून भारताला शाश्वत प्लास्टिक व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचा कंपनीचा मानस आहे.






