• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Book Reading And Youth Nrps

तरुण पिढी वाचत नाही, हे म्हणणं चुकीचं..!

'आज लेखक खूप आहेत तसेच वाचकही प्रचंड आहेत. फक्त चांगली पुस्तकं प्रकाशित करायला हवीत. वाचकांनी कधीही प्रकाशकांची निराशा केलेली नाही. वाचकांमुळे आम्ही जगलेले आहोत. त्यामुळे सगळ्यात पहिले आभार हे वाचकांचे आहेत आणि तेच आमचे मायबाप आहेत!'... असं मत मनोविकास प्रकाशनाचे संस्थापक नामवंत प्रकाशक अरविंद पाटकर यांनी मांडलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 31, 2023 | 06:00 AM
तरुण पिढी वाचत नाही, हे म्हणणं चुकीचं..!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अरविंद पाटकर प्रकाशन व्यवसायात येण्यापूर्वी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षात कार्यरत असताना पक्षाच्या वतीने एक आठवडा किंवा पंधरवडा पक्षीय वाङ्‌मय आणि रशियन वाङ्‌मय पुस्तकांची विक्री चालत असे. कॉ. श्रीपाद अमृत डांगेंच्या सभा तसेच इतर सभांमध्ये पाटकर पुस्तकं घेऊन आवडीनं पुस्तक विक्री करत असत. इथूनच त्यांना पुस्तक विक्रीची आवड निर्माण झाली आणि पुस्तकाशी त्यांचं नातं कायमच जोडलं गेलं.

पक्षातून बाहेर पडल्यावर अभिनव प्रकाशनच्या वा. वि. भट यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभलं. पुस्तक विक्रीच्या आवडीतून पाटकर यांच्या मनोविकास प्रकाशनचं पहिलं अपत्य जन्माला आलं, ते म्हणजे लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठेंचं ‘शाहीर’ हे पुस्तक. लावणी, गाणी, पोवाडे एकत्रित असलेल्या या पुस्तकाला कॉ. डांगे यांची प्रस्तावना लाभली. इथूनच त्यांचा प्रकाशन व्यवसाय सुरू झाला. पुढे वैचारिक आणि माहितीपर पुस्तकं ही मनोविकासने स्वतःची एक ओळख निर्माण केली.

खरं तर प्रत्येक पुस्तक प्रकाशकाला आवडेल, ते लोकांना आवडेलच, याची काहीच खात्री देता येत नाही. प्रकाशकांचा नेमका कस इथेच लागतो. याविषयी पाटकर म्हणाले, ‘पुस्तक विक्रीमधील बडं प्रस्थ असलेल्या मॅजेस्टिकच्या तुकाराम कोठावळे यांनी आम्हाला एक अलिखित नियम सांगितला, तो म्हणजे तुम्ही ज्यावेळी १० पुस्तकं काढता, तेव्हा तुमची दोन पुस्तकं धावत असतात, दोन पुस्तकं चालत असतात, दोन पुस्तकांना आपल्याबरोबर घेऊन तुम्ही चालत असता, दोन पुस्तकांना फरपटत नेत असता, तर दोन पुस्तकं काही केल्या तुमच्या घरातून बाहेर पडत नाहीत. मात्र त्या धावणाऱ्या दोन पुस्तकांसाठी तुम्हाला पुन्हा १० पुस्तकांना जन्म द्यावा लागतो.’
साधारण काही वर्षं गेल्यानंतर कोणत्या विषयाची पुस्तकं काढल्यावर लोकांना आवडतात, याचा एक अंदाज येऊ लागतो किंवा तुमचं प्रकाशन कोणत्या विचाराने प्रेरित आहे यावर भर दिला जातो. यालाच अनुसरून मनोविकासने नेहमी जे चांगलं आणि महत्त्वपूर्ण आहे, तेच वाचकांपुढे ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

आज मुलांचा किंवा तरुण पिढीचा पुस्तक वाचनाकडे कल नाही, असा सरसकट आरोप केला जातो. या आरोपाला खोडून टाकत ते म्हणाले, ‘जुनी लोकं तरी सगळीच वाचत होती का? तर नाही. जे वाचत नाहीत, तेच असे आरोप करत असतात. वाचणाऱ्यांचा एक वर्ग असतो, तसा न वाचणाऱ्यांचाही एक वर्ग असतो. पुण्यात नॅशनल बुक ट्रस्टच्या प्रदर्शनात पुस्तकं खरेदी करणारी हजारो तरुण मुलंच आहेत. मग आपण त्यांच्यावर का आरोप करायचा? वाचनाची पिढी तयार करावी लागते, आपणच ती करत नाही. मुलांना चांगली पुस्तकं आणून दिली पाहिजे. तसंच शालेय विद्यार्थ्यांनी गाईड वाचून नाही, तर धडा वाचून अभ्यास करायला पाहिजे. मूल रडायला लागलं किंवा ते जेवावं म्हणून हातात मोबाइल देतो. त्याऐवजी त्याला पुस्तक देतो का?… किंवा त्याला वाचून दाखवतो का? आपणच मुलाला मोबाइलचं व्यसन लावतो; पण पुस्तकाचं, वाचनाचं व्यसन लावत नाही. त्यामुळे मुलं वाचत नसतील तर त्याचा दोष मुलांना नाही, तर पालकांना दिला पाहिजे’.

आधुनिक काळात सर्वकाही ऑनलाइन उपलब्ध झालं आहे. यातीलच एक म्हणजे ई-बुकची संकल्पना. याविषयी ते म्हणाले, ‘पुस्तक हातात घेऊन वाचणं, याचा एक वेगळाच आनंद असतो. आताच झालेल्या एका सर्व्हेनुसार पूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडीवर होतं, आता प्रिंट मीडिया आघाडीवर आहे. जगभरातून आता खूप चांगली पुस्तकं येत आहेत. नवे प्रकाशक तयार होत आहेत.’
कोणत्याही प्रकाशकाविषयी तसंच चांगली पुस्तकं आणि वाचकांविषयी मनमोकळेपणानं आणि भरभरून बोलणारे पाटकर गेली अनेक वर्षं सातत्याने दर्जेदार पुस्तक निर्मितीसाठी झटत आहेत. ते म्हणतात, ‘लेखक लिहितो, आम्ही प्रकाशित करतो. पण एखादं पुस्तक जर लोकांच्या डोक्यात भिनलं, तर लोकं शोधत येऊन पुस्तक खरेदी करतात. हाडाचा वाचक हा थांबत नाही. त्याला हवं असलेलं पुस्तक तो कुठुनही मिळवतोच आणि वाचतो. खरंतर लोकं वाचतात, उत्तम वाचतात. पुस्तकं घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही, हा आमचा दोष आहे. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांत ललित साहित्याची दुकानं फक्त ४२ आहेत आणि २० जिल्ह्यांत तर एकही दुकान नाही. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईमध्ये ललित साहित्याची अवघी ५-७ दुकानं आहेत. उपनगरांतली दुकानं तर शोधावी लागतील. ज्यांना पुस्तकं वाचायची आहेत, त्यांना जर पुस्तकं समोर दिसतच नसतील तर ते काय करणार? पण वाचणारा माणूस त्याच्या आवडीचं पुस्तक कुठूनही शोधून काढून वाचतो. प्रकाशक काही करत नाही. खरं तर वाचकांनी हा व्यवसाय जिवंत ठेवला आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे.’

-अनघा सावंत

Web Title: Book reading and youth nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • book reading

संबंधित बातम्या

National Reading Day 2025 : ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या धावपळीच्या आयुष्यातही वाचनाची सवय कशी विकसित करावी?
1

National Reading Day 2025 : ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या धावपळीच्या आयुष्यातही वाचनाची सवय कशी विकसित करावी?

वाचनाला ‘DIGITAL’ पाठबळ: पुण्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन
2

वाचनाला ‘DIGITAL’ पाठबळ: पुण्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bihar SIR: बिहारमध्ये SIRची अंतिम मतदार यादी जाहीर; २.१ दशलक्ष नवीन मतदारांचा समावेश

Bihar SIR: बिहारमध्ये SIRची अंतिम मतदार यादी जाहीर; २.१ दशलक्ष नवीन मतदारांचा समावेश

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल

भारतातील पहिला स्वदेशी AI कॉल असिस्टंट, Unknown Number वर साधणार संवाद, कधी होणार लाँच?

भारतातील पहिला स्वदेशी AI कॉल असिस्टंट, Unknown Number वर साधणार संवाद, कधी होणार लाँच?

Women’s क्रिकेट वि.Men’s क्रिकेट:- महिला क्रिकेटचा बदलत्या प्रवाहावर एक नजर

Women’s क्रिकेट वि.Men’s क्रिकेट:- महिला क्रिकेटचा बदलत्या प्रवाहावर एक नजर

Asia cup 2025 : ‘मी शब्दांनी नाही, माझ्या बॅटने उत्तर…’, अंतिम सामन्यातील नायक तिलक वर्माकडून पाकिस्तानला शाब्दिक मार 

Asia cup 2025 : ‘मी शब्दांनी नाही, माझ्या बॅटने उत्तर…’, अंतिम सामन्यातील नायक तिलक वर्माकडून पाकिस्तानला शाब्दिक मार 

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.