• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Hemant Desai New Book Jane Kaha Gaye Wo Din Nrps

सुपरस्टार्सच्या आठवणींचा धांडोळा

‘जाने कहाँ गये वो दिन...’ हे बाबू मोशाय यांचे अलीकडे प्रकाशित झालेले चित्रपटविषयक पंधरावे पुस्तक. २४८ पानांच्या या पुस्तकात चित्रपट सृष्टीतील गेल्या सत्तर वर्षांतील गाजलेल्या सुपरस्टार्सचा त्यांच्या कलागुणांविषयीचा धांडोळा लेखकाने घेतला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 29, 2023 | 06:00 AM
सुपरस्टार्सच्या आठवणींचा धांडोळा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
लेखन व पत्रकारितेत जवळपास पाच दशकांचा अनुभव असलेले बाबू मोशाय म्हणजे हेमंत देसाई, दैनिक साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक यांतून त्यांच्या लेखणीची मुशाफिरी पन्नास वर्षे अविरत चालू आहे.
‘जाने कहाँ गये वो दिन…’ हे बाबू मोशाय यांचे अलीकडे प्रकाशित झालेले चित्रपटविषयक पंधरावे पुस्तक. २४८ पानांच्या या पुस्तकात चित्रपट सृष्टीतील गेल्या सत्तर वर्षांतील गाजलेल्या सुपरस्टार्सचा त्यांच्या कलागुणांविषयीचा धांडोळा लेखकाने घेतला आहे.
त्या त्या कलावंताच्या चित्रपट कारकीर्दीचा सांस्कृतिक प्रवास सांगणारे हे पुस्तक आहे. वहिदा रेहमान, प्राण, शशी कपूर, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, ऋषी कपूर, विनोद खन्ना, प्रदीपकुमार, गीतकार आनंद बक्षी यांच्या आठवणी, किस्से आदींची माहिती अत्यंत रंजक व आपल्या खुमासदार शैलीत बाबू मोशाय यांनी मांडली आहे.
या पुस्तकात १९५० ते २०१९ पर्यंतच्या काळातील विविश्व चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या आविष्काराचे विविध कंगोरे दाखवणाऱ्या तत्कालीन सुपरस्टार्सच्या सिनेप्रवासातील आठवणी आहेत.
‘आज फिर जीने की तमन्ना है…’ या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात ग्रेसफूल अभिनेत्री वहिदा रेहमानच्या सुसंस्कृत, प्रसन्न व विनम्र स्वभावाचे अनेक पैलू उलगडून दाखवत कुलवधू, गणिका, ग्रामकन्या, शहरी मॉडर्न तरुणी अशा सर्व भूमिकांमध्ये ती अव्वल ठरली. आंध्रमधील सनातनी मुस्लीम कुटुंबात जन्माला येऊनदेखील आधुनिक व सर्वसमावेशक विचार ही वहिदाची खासियत होती. दहाव्या वर्षापासूनच तिने नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. संवाद नुसते म्हणायचे नसतात तर त्यात भावना ओतणं आवश्यक असतं यावर तिचा विश्वास होता, त्यामुळे तिची अभिनयशैली आधुनिक जाणिवांची होती. तिच्या साड्या व्यक्तिरेखेशी सुसंगत असत. फिल्मी नसत. बोलण्यापेक्षा न बोलता सांगण्याकडे वहिदाचा अधिक कल असल्याने तिचे डोळे व हावभाव अधिक बोलके असायचे. गुरुदत्तसारख्या मार्गदर्शकामुळे तिच्या अभिनयातील जाणिवा अधिक तीव्र झाल्या एकेकाळी आशा पारेख नैराश्यात असताना आत्महत्येच्या विचारात होती तेव्हा वहिदाने तिचे मन वळवलं होते. या व अशा असंख्य आठवणी अनेक चित्रपटांच्या उदाहरणांतून लेखकाने सांगितल्या आहेत.
‘बरखुरदार!’ हा प्राणवर लिहिलेला लेख. ३६ पानांच्या विस्तृत लेखात आपण प्राणचे काही सिनेमे पाहिले असतील तर त्याचे स्मरण होते. हा लेख वाचत असताना प्राणचे चालणे, बोलणे, त्याचा चेहरा, हेअरस्टाइल सर्व डोळ्यासमोर उभे राहते. १९४२ ते १९९६ पर्यंत म्हणजे ५४ वर्षांची प्राणची चित्रपटातील कारकीर्द. या प्रवासातील बहुतेक सर्वच चित्रपटांचा आढावा लेखकांनी घेतला आहे. अत्यंत निगर्वी व मवाळ माणूस परंतु त्यांनी व्यक्तिरेखा साकारल्या त्या खलनायकी. या खलनायकीपणाला त्यांच्या अनुभवाची, निरीक्षणाची जोड होती त्यामुळेच त्याच्यातला व्हिलन कधी मोनोटोनोस वाटला नाही. आसपासच्या लोकांमधून लकबी उचलणे, आवाजात, बाह्यरूपात, हावभावात कॅरेक्टरनुसार बदल करणे हा त्यांचा शौक होता. बरीच पुस्तके नि मासिके चाळून एखाद्याची वैशिष्ट्यपूर्ण दाढीमिशी, विगचा गेटअप कसा आहे तो बघायचे. १९४७ साली उर्दू भाषा व शेरोशायरीचा अभ्यास असलेला अभिनेता मुंबईत आला व पुढील पन्नास वर्षे खलनायक म्हणून रसिकांत स्थिरावला.
या पुस्तकातील सर्वच लेख वाचत असताना लेखक बाबू मोशाय यांच्या अफाट स्मरणशक्तीची कल्पना येते. चित्रपट, त्याचे नाव, गाणे, प्रसंग, त्या प्रसंगातील वेशभूषा इ. गोष्टींची ते आठवण करून देतात. हे सांगत असताना नुसतं सिनेमाविषयी ते बोलत नाहीत तर समकालीन गोष्टींशी ते सांगड घालतात. उदा. प्राण पूर्वी हॉकी व फुटबॉल खेळायचे ते बीसीसीआयचेही सदस्य होते. १९५१-५२च्या सुमारास त्यांनी फुटबॉल क्लबची स्थापना केली. प्राणच्या क्लबने वेस्टर्न इंडिया फुटबॉल चॅपियनशिप आणि नाडकर्णी कप जिंकला होता, १५-१५ खेळाडूंचा राहण्या-जेवण्याचा व इतर खर्च प्राण करायचा पण केवळ शौकापोटी; शाहरुख, प्रिंटी झिंटा कमावण्यासाठी आयपीएलमध्ये उतरले, हा दोन पिढ्यांमधील फरकही ते सांगतात.
१४८ हिंदी चित्रपटांत काम करणारा शशी कपूर हा राजबिंडा, आयुष्य भरभरून जगणारा, जीव लावणारा कलाकार होता. अंतर्बाह्य निर्मळ, प्रेमळ, सरळ असणाऱ्या या अभिनेत्याची थिएटरवर तेवढीच श्रद्धा होती हा लेख वाचताना जाणवते..
साठ वर्षाहून जास्त सिनेसृष्टीत असणारा धर्मेंद्र लाइट कॉमेडीजमधील टायमिंग सेन्ससाठी व चिरक्या आवाजातील संवादफेकीसाठी लक्षात राहतो. हॉलिवूडमधील चार्लस ब्रॉन्सन या हाणामाऱ्या करणाऱ्या राकट व रगैल नायकाप्रमाणेच धर्मेंद्र होता: भारताच्या उत्तरेकडील भागात त्याची लोकप्रियता अजूनही तुफान आहे.
मि. नटवरलाल हा अमिताभ बच्चनवरील लेखही त्याच्या प्रवासाची चढती कमान सांगणारा आहे. सामाजिक अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला नायक हेही त्याच्या लोकप्रियतेचे एक कारण आहे हे लेख वाचताना लक्षात येते. आजही त्याची क्रेझ कायम आहे. ऐंशी पार केलेला हा नायक सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असतो, नवनव्या जाहिराती करतो, सरकारच्या पोलिओ, स्वच्छता अभियानाचा प्रचार करतो, केबीसीमधून दिसतो. सतार वाजवतो, कवितावाचन करतो मग अमिताभ बच्चनला म्हातारा का म्हणायचं? असा प्रश्न ते वाचकांना विचारतात पण त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांशी जमवून घेणारा, पोलिटिकली करेक्ट बोलणारा (पण मनापासून नाही) अमिताभ खटकतो असंही ते लिहून जातात.
१९७०च्या दशकातला भारतातला पहिला सुपरस्टार राजेश खन्नाचे प्रेक्षकांच्या मनावर वेगळेच गारूड होते. ओतप्रोत प्रेम करणारा प्रियकर, जिवापाड दोस्ती जपणारा दोस्त आणि श्रावणबाळाप्रमाणे माता-पित्यांची काळजी वाहणारा मुलगा अशी नायकाची प्रतिमा राजेशखन्नाने बनवली. स्लिम ट्राउजर्स नि कुर्ता शर्ट त्याने लोकप्रिय बनवला.
आठवणींच्या आधारे कोणत्याही विषयावर लिहिणे तसे सोपे नाही, कधी काळी पाहिलेला चित्रपट, त्यातील कलाकार, घटना, प्रसंग, गाणी लक्षात ठेवणे व एकाच कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाची विभिन्न पात्रांमधील गुंफण करताना चित्रपटसृष्टीतील आजी-माजी तारकांशी तुलना करत नावीन्यातील सांस्कृतिकता सांगणे हे कठीण काम आहे. एखादा प्रसंग सांगत थेट अलीकडच्या काळातील नायकाची लेखकाला लगेच आठवण होते. उदा. धमेंद्रचे फोर आर्मस्, बायसेप, ट्रायसेप आणि पोटऱ्यांचे स्नायू यांचे सलमान आजही कौतुक करतो. ही व अशी अनेक उदाहरणे प्रस्तुत पुस्तकात आहेत.
चित्रपटांचा इतिहास, कलाकार, तंत्रज्ञ अशा अनेकानेक घटकांचा अभ्यास करून बाबू मोशाय यांनी ही दृष्टी कमावलेली आहे. त्यामुळेच लहानपणी, तरुणपणी पाहिलेल्या चित्रपटांच्या आठवणी त्यांच्या मनात घट्ट रुजलेल्या आहेत. याचाच परिपाक म्हणजे सिनेसृष्टीशी संबंधित पंधरा पुस्तके ते लिलया लिहू शकतात.
वास्तविक हेमंत देसाई तथा बाबू मोशाय यांनी सारथी, डावपेच, भूमिका, मनमोहन पर्व यांसारखी वैचारिक व आशयघन पुस्तके लिहिली आहेत. त्यांची ‘भोवळ’ ही कादंबरी वाचकांना परिचित आहे. एक पत्रकार म्हणून चित्रपटविषयक लिखाणात अपल्या सहजस्फूर्त लेखनशैलीने वेगळी दृष्टी देणारे त्यांचे लेखन चित्रपट रसिकांच्या मनात कोरले गेले आहे. हिंदी चित्रपटांच्या अनेक दशकांच्या निर्मितीप्रवासातील या पुस्तकातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनय व्यक्तित्वाचा घेतलेला धांडोळा हा संस्मरणीय आहेच पण त्याहीपेक्षा चित्रपटावर अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी तो एक संदर्भग्रंथ आहे,- प्रा. रघुनाथ राजाराम शेटकर
raghunathshetkar0@gmail.comजाने कहाँ गये वो दिन…
लेखक : बाबू मोशाय
प्रकाशक : अरविंद जोशी, संधिकाल प्रकाशन, भाईंदर
पृष्ठ : २४८, मूल्य : रु. २७५/-

Web Title: Hemant desai new book jane kaha gaye wo din nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • Waheeda Rehman

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Love Marriage केल्यानंतरही रोज भांडणाने डोक्याचा वाढलाय ताप? नात्यातील कडवटपणा काढण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा ‘मंत्र’

Love Marriage केल्यानंतरही रोज भांडणाने डोक्याचा वाढलाय ताप? नात्यातील कडवटपणा काढण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा ‘मंत्र’

Nov 19, 2025 | 11:02 AM
हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…

Nov 19, 2025 | 11:01 AM
१५ मिनिटांत अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा चमचमीत टोमॅटो शेव भाजी, दुपारच्या जेवणात होईल चविष्ट बेत

१५ मिनिटांत अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा चमचमीत टोमॅटो शेव भाजी, दुपारच्या जेवणात होईल चविष्ट बेत

Nov 19, 2025 | 11:00 AM
शस्त्रधुरंधर आणि युद्धकलानिपुण राणी लक्ष्मीबाईंची जयंती; जाणून घ्या 19 नोव्हेंबरचा इतिहास

शस्त्रधुरंधर आणि युद्धकलानिपुण राणी लक्ष्मीबाईंची जयंती; जाणून घ्या 19 नोव्हेंबरचा इतिहास

Nov 19, 2025 | 11:00 AM
Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट

Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट

Nov 19, 2025 | 10:56 AM
अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम

अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम

Nov 19, 2025 | 10:54 AM
Men’s Day 2025 : घरातील पुरुषांना करा खुश, खास दिनानिमित्त घरी बनवा युपीची फेमस डिश ‘दही के शोले’

Men’s Day 2025 : घरातील पुरुषांना करा खुश, खास दिनानिमित्त घरी बनवा युपीची फेमस डिश ‘दही के शोले’

Nov 19, 2025 | 10:53 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.