• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Sharad Pawar Move In Politics Nrsr

पवारांच्या खेळीने सरकारची कोंडी

शरद पवार यांच्याबद्दल अनेक आख्यायिका तयार केल्या जातात. त्या इतक्या रंगवल्या जातात की जणू जगात होणारी प्रत्येक घटना शरद पवार यांच्याभोवतीच फिरते आहे, असा भास तयार केला जातो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यातील अतिशयोक्ती सोडली, तरीही बर्‍यापैकी तशीच स्थिती आहे. राजकारणातील या पितामहाने तीन - तीन पक्षांच्या सरकारला जेरीस आणले आहे. पक्ष, निष्ठावान सहकारी सोडून गेल्यानंतरही पुन्हा नव्याने सगळं उभं करण्याची ही शक्ती केवळ पवारांच्या ठिकाणीच आहे.

  • By साधना
Updated On: Sep 10, 2023 | 06:00 AM
पवारांच्या खेळीने सरकारची कोंडी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अजित पवार यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या खेम्यात आणली. शरद पवार यांच्या जवळचे, त्यांचे निष्ठावंत आणि त्यांच्यासोबत अनेकवेळा भूमिका बदलणारे नेतेही अजित पवार यांच्यासोबत आले. भाजपमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून अजित पवार आले असतील, असे नाही. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आशीर्वाद मिळवला तर अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी चर्चा होती. भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला योग्य म्हणा आणि पुढच्या वाटचालीस आशीर्वाद द्या, हे मागणे घेऊन पुतण्याने काकांची दोनदा मनधरणी केली. अजित पवार यांची संपूर्ण कारकिर्द डावावर लागलेली असल्यामुळे कदाचित त्यांनी इतरही अनेक माध्यमातून आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्याही माध्यमातून कदाचित काकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असेल. पण अजित पवारांच्या बंडाला तिथेच विरोध करून नव्याने सगळी बांधणी करण्याचा जाहीर संकल्प केलेले शरद पवार अविचल राहिले. तिथूनच खर्‍या अर्थाने या डावाला सुरुवात झाली.

अजित पवार यांनी टाकलेल्या पहिल्याच डावाला शरद पवार यांनी उलटवून लावत, पाठोपाठ अनेक डाव टाकले. अत्यंत आक्रमकपणे एकापाठोपाठ एक घेतलेल्या सभा असोत किंवा इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीसाठीचा पुढाकार, शरद पवार यांनी संपूर्ण आखाडाच अंगावर घेतला. ही लढाई भाजप विरुद्ध अजित पवार नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची राहू न देता त्यांनी भाजप किंवा राज्यातील महायुती विरुद्ध शरद पवार अशी करून टाकली.
भाजपसोबत आलेले शिंदे आणि त्यानंतर अजित पवार ही महायुतीची मोठी शक्ती तयार झाली. सगळ्याबाजुने कोंडी झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पिछाडली. त्याचवेळी आता काँग्रेस वगळता कोणी फारसा विरोधक नाही, असे भाजपला वाटत असताना शरद पवार यांनी घेतलेली आघाडी आणि महायुतीला थेट दिलेले आव्हान यामुळे भलेभले चाणक्य गांगरुन गेलेले दिसू लागलेत.

इंडिया आघाडीच्या बैठकीत पुढाकार घेणार्‍या शरद पवारांनी सगळ्याच आघाडीवर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांसमोर आव्हान उभे केले आहे. महायुती विरुद्ध हा ज्येष्ठ नेता, असे चित्र उभे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या दिग्गज नेत्यांसमोर एकास एक असे आव्हान उभे करण्यास सुरुवात केली आहे. मुंडे, भुजबळ, मुश्रीफ यांच्याविरुद्ध एकेक तगडा स्पर्धक समोर आणत शरद पवार यांनी त्यांच्याच एकेकाळच्या शिलेदारांना गोत्यात आणले.

थोरल्या पवारांनी पुतण्याची उणी – दुणी काढण्याऐवजी आजुबाजुने त्यांच्या शिलेदारांना घेरण्यास सुरुवात केली. भुजबळांवर येवल्यात त्यांनी आगपाखड केली. त्यानंतरचे कितीतरी दिवस भुजबळांना त्याबाबत खुलासे करत रहावे लागले. ज्येष्ठ पवारांवर भुजबळ वैयक्तिक टिका करु शकत नाहीत. कारण त्यांना ‘विठ्ठला’वर आमची श्रद्धा कायम आहे, हे दाखवावेच लागणार आहे. बीडमध्ये धनंजय मुंडे यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी किंवा मुंडे यांचा तगडा स्पर्धक असलेल्या बबन गित्ते यांना पवारांनी बळ दिले. अनेक वर्षांपासूनचा मुंडे यांचा स्पर्धक राष्ट्रवादीत घेत शरद पवार यांनी मुंडे यांना जागच्या जागी खिळवून ठेवले. येणार्‍या कोणत्याही निवडणुकीत मुंडे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार, हे नक्की. ज्या प्रमाणे येणार्‍या काळात भुजबळांना जसे येवल्यात अडकून रहावे लागेल, तसेच मुंडेना परळीबाहेर लक्ष घालणे कठीण होईल. तिकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या आणि अनेक वर्षांपासून भाजपला दोन खासदार देणार्‍या जळगावात खडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी केली आहे. एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना पवारांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद दिले आहे. तर जळगावात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे कडवे विरोधक बी. एस. पाटील यांना पक्षात घेतले आहे. त्याच व्यासपीठावर राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना लोकसभेचीही ऑफर दिली. कोल्हापुरातही हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पवारांनी शड्डू ठोकले. शरद पवार यांच्या आतापर्यंत झालेल्या सभा पाहता त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणण्यापेक्षा भाजपला आव्हान उभे करण्यास सुरुवात केली आहे. ज्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सगळी तोडफोड सुरु आहे, तिच निवडणूक त्यांना कठीण करण्यासाठी हे डावपेच दिसताहेत.

अजित पवारांसोबत भाजपच्या वळचणीला गेलेल्या मोठ्या नेत्यांच्या विरोधातील त्यांचे सक्षम विरोधक समोर आणत असतानाच शरद पवारांनी कांद्याचे भाव किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दासुद्धा तापवत ठेवला आहे. महायुतीमध्ये या दोन्ही मुद्द्यांमुळे प्रचंड अस्वस्थता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तर चक्क काटेवाडीत अजित पवारांविरोधात घोषणाबाजी झाली. यावरुन विरोधातील वातावरण कुठपर्यंत तयार झाले आहे, हे लक्षात यायला हवे. महायुतीकडे असलेले प्रभावी नेते, ओबीसी नेते किंवा राज्यात ज्यांच्या जातीचे काही मतदान त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता आहे, अशांना त्यांच्या मतदारसंघात बंदिस्त करून ठेवण्याचा एक प्रयत्न या सगळ्यामागे आहे. ओबीसी मतदारांमध्ये असंतोष वाढविण्यासह त्यांच्या संपर्कातील महायुतीच्या नेत्यांना आपापल्या तगड्या स्पर्धकांशी लढण्यात गुंतवून ठेवण्याची ही खेळी सुरु झालीय.

एकीकडे काहीही झाले तरी लोकसभा जिंकायची, मिशन 45 प्लस अशा घोषणा सुरु असताना दुसरीकडे एकेक मतदारसंघ बारीक पोखरून तिथे सुरुंग पेरण्याचे काम थोरल्या पवारांनी सुरु केले आहे. त्याचवेळी इंडियाला बळ देत सगळ्या पक्षांमध्ये समतोल राखण्याचीही त्यांची धडपड आहे. तर अद्याप पवार सोबत असल्यामुळेच उद्धव ठाकरेंची विरोधाची भूमिकासुद्धा कायम आहे.

एकाचवेळी अनेक आघाड्यांवर असणार्‍या पवारांची ही खेळी आहे. यासगळ्यात इंडियाला बळ मिळतेय, ठाकरे विरोधकाची भूमिका निकराने वठवताहेत आणि पक्षाची शकले करून बाहेर पडलेले आपापल्या मतदारसंघात अडकून पडणार आहेत. त्याचवेळी आमच्या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. लोकशाही असल्यामुळे एका गटाने वेगळी भूमिका घेतली, हे पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्व केंद्रीय यंत्रणेला सांगते आहे. या सगळ्यामुळे, सरकारची अपेक्षित कोंडी साध्य झालीय.
– विशाल राजे

Web Title: Sharad pawar move in politics nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • BJP
  • Rashtrawadi Congress

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
1

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?
2

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना
3

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?
4

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

UDISE नोंदणीची धक्कादायक आकडेवारी! महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा

UDISE नोंदणीची धक्कादायक आकडेवारी! महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा

पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात

पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात

उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं सडकं अन् नासलेलं भाषण…! भाजप नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका

उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं सडकं अन् नासलेलं भाषण…! भाजप नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका

Sharad Purnima: शरद पौर्णिमेला भद्राची सावली? रात्री खीर कशी ठेवायची, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय

Sharad Purnima: शरद पौर्णिमेला भद्राची सावली? रात्री खीर कशी ठेवायची, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.