वाहन व आरोग्य विमा उत्पादनांच्या माध्यमातून सामान्य विमा क्षेत्राच्या चाकोऱ्या मोडल्यानंतर अॅको टेक या अॅको (Acko) जनरल इन्शुरन्सच्या पालक कंपनीने अॅको लाइफ इन्शुरन्स या आपल्या नवीन विभागाची घोषणा केली आहे. याद्वारे क्रांतिकारी फ्लेग्झी टर्म लाइफ इन्शुरन्स प्लान कंपनीने आणला आहे. अॅकोचा विमा हा वाजवी दर, सोय आणि ग्राहकांना उत्तम दर्जाचा अनुभव देणे यावर आधारित आहे.
Acko च्या फ्लेग्झी टर्म लाइफ इन्शुरन्स प्लानची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये:
• हे उत्पादन पॉलिसीधारकाला त्याच्या बदलत्या आर्थिक जबाबदाऱ्यांनुसार संरक्षणाची रक्कम वाढवण्याची किंवा कमी करण्याची मुभा देते, जेणेकरून पॉलिसीधारकाला योग्य ते संरक्षण मिळत राहील याची खात्री होते.
• आयुष्यातील उद्दिष्टांनुसार पॉलिसीचा कालावधी बदलण्याची मुभाही हे उत्पादन पॉलिसीधारकांना देते, आयुष्यातील उद्दिष्टांनुसार लघुकालीन संरक्षण घेण्याचे किंवा नंतरच्या वर्षांनाही लागू होईल असे संरक्षण पॉलिसीधारकांना मिळते.
• पॉलिसीधारक आपल्या विशिष्ट गरजांनुसार व आयुष्यातील टप्प्यांनुसार पॉलिसीची आखणी करून घेऊ शकतात, उदाहरणार्थ गंभीर स्वरूपाचा आजार किंवा अपघाती मृत्यू या शक्यता लक्षात घेऊन संरक्षण घेऊ शकतात.
• Acko च्या या योजनेद्वारे डिजिटल विल नावाची एक सुविधा नव्याने देण्यात आली आहे, त्यामुळे ग्राहकाला त्याचे इच्छापत्र सहजगत्या तयार करणे, त्यात बदल करणे आणि ते ऑनलाइन मार्गाने सुरक्षितपणे सेव्ह करून ठेवणे शक्य होणार आहे, जेणेकरून त्याच्या/तिच्या इच्छांना कायदेशीर मान्यता मिळेल आणि त्यांच्या जवळच्या व्यक्ती संरक्षित राहतील.
शिवाय, टर्म लाइफ इन्शुरन्स प्लान अपवादात्मक लवचिकता देऊ करतो, त्यामुळे ग्राहकाला पॉलिसीच्या पॉलिसीच्या मुदतीत कधीही पेआउट पर्याय बदलून घेता येतात. पॉलिसीधारक एकरकमी पेआउट, मासिक हप्ते किंवा वार्षिक हप्ते यांच्यापैकी हवा तो पर्याय निवडू शकतात. दाव्याच्या प्रक्रियेदरम्यानही बदलत्या आर्थिक गरजांनुसार पेआउट्स घेण्याची मुभा ग्राहकांना मिळते.
अॅको मुदत आयुर्विमा योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या विमा योजनेमध्ये ग्राहकांना गरजेनुसार संरक्षणाची रक्कम किंवा मुदतीत बदल करण्याची लवचिकता आणि संरक्षण पुरवते.
थेट ग्राहकाला डिजिटलकेंद्री अनुभव देण्याचा प्रयत्न
अॅकोचे संस्थापक वरुण दुआ या योजनेबद्दल म्हणाले, “आयुष्यातील अनिश्चितता आणि ग्राहकांच्या आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर बदलत जाणाऱ्या गरजा यांची जाणीव अॅकोला आहे. ग्राहकांनी आयुर्विम्याकडे गुंतवणूकीचे साधन म्हणून न बघता त्यांच्या व कुटुंबियांच्या संरक्षणाचा मार्ग म्हणून बघावे असे आम्हाला वाटते. भविष्यकाळातही आमचा भर पूर्णपणे संरक्षणकेंद्री उत्पादने देण्यावर कायम राहील. आता आम्ही जे उत्पादन बाजारात आणले आहे तशीच मुदत आयुर्विमा उत्पादने बाजारात आणण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करू.”
ते पुढे म्हणाले, “अॅकोच्या तंत्रज्ञानातील कौशल्यांच्या जोरावर विमा उद्योगाला नवीन आकार देण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. आम्ही थेट ग्राहकाला डिजिटलकेंद्री अनुभव देण्याचा प्रयत्न करू आणि त्याद्वारे उद्योगक्षेत्रात नवीन मापदंड स्थापन करू. ग्राहकांसाठी योग्य असलेली उत्पादने देणे आणि त्यांना अधिक मूल्य व श्रेष्ठ ग्राहक अनुभव पुरवणे आम्ही कायम राखू…
फ्लेग्झी टर्म प्लान केवळ सर्वसमावेशक संरक्षणच देऊ करत नाही, तर ग्राहकांना त्यांच्या बदलत्या गरजांनुसार त्यांचे संरक्षण कस्टमाइझ करण्याची व समायोजित करण्याची मुभा देते. त्यामुळेच हे उत्पादन भविष्यकाळात खऱ्या अर्थाने बाजारपेठेतील ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.”