अदानी शेअर्समध्ये वाढ (फोटो सौजन्य - iStock)
सोमवारी शेअर बाजार हिरव्या चिन्हावर उघडला आणि त्यामुळे सर्वच गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यासोबतच अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्येही प्रचंड वाढ दिसून आली. विशेषतः ज्यांनी २०२५ च्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत नफा कमावला आहे त्यांना याचा अधिक फायदा असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अदानी ग्रुप कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) चे शेअर्स देखील समाविष्ट आहेत. सोमवारी, बाजार उघडल्यानंतर दोन तासांत यामध्ये सुमारे ७ टक्क्यांनी वाढ झाली.
शुक्रवारी हा शेअर १२६७.०५ रुपयांवर बंद झाला. सोमवारी तो १२९७.५० रुपयांच्या वाढीसह उघडला. पण काही काळानंतर त्यात थोडीशी घट झाली आणि ती १२८५.३० रुपयांवर आली. पण यानंतर ते झपाट्याने वाढू लागले. काही वेळातच ही वाढ ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाली. सोमवारी सकाळी ११:१५ वाजता, शेअर १३५४.८० रुपयांवर व्यवहार करत होता, जवळजवळ ७ टक्क्यांनी वाढला.
Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे पुनरागमन, सेन्सेक्स-निफ्टी वधारले
नुकसान भरपाई
शुक्रवारीही या शेअरमध्ये ४.४% वाढ झाली होती. निफ्टी निर्देशांकात अदानी पोर्ट्स सर्वाधिक वाढले. आता कंपनीने २०२५ मध्ये झालेल्या सर्व नुकसानाची भरपाई या शेअरने केली आहे. या वर्षी आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात शेअर्समध्ये २०% पेक्षा जास्त वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मार्केटमध्ये या शेअरची सध्या चर्चा आहे.
कंपनीचा नफा
अदानी पोर्ट्सने गेल्या आठवड्यात त्यांचे आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीचे अर्थात जानेवारी ते मार्च या महिन्याचे निकाल जाहीर केले. कंपनीने चौथ्या तिमाहीत नफ्यात ५०% वाढ झाल्याचे नोंदवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नफा ३,०२३ कोटी रुपये झाला आहे, तर गेल्या वर्षी तो २,०२५ कोटी रुपये होता. कंपनीचा महसूल २३% वाढून ८,४८८ कोटी रुपये झाला. EBITDA अर्थात व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीचे उत्पन्न हे २४% वाढून ५,००६ कोटी रुपये झाले.
कंपनीच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी गुप्ता म्हणाल्या की, आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीने ११,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त पीएटी अर्थात करानंतरचा नफा आणि ४५० एमएमटी अर्थात दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करून विक्रमी कामगिरी केली.
गुंतवणूकदारांचे १० लाख कोटींचे नुकसान, ‘या’ कारणांमुळे शेअर बाजारात घसरण
लॉजिस्टिक विभागाचीही कमाई
कंपनीच्या लॉजिस्टिक्स विभागाचे उत्पन्न जवळजवळ दुप्पट होऊन १,०३० कोटी रुपये झाले. कंपनीने ट्रकिंग आणि एकात्मिक मालवाहतूक सुविधांचा विस्तार केल्यामुळे हे घडले. लॉजिस्टिक्स EBITDA १८१ कोटी रुपयांपर्यंत वाढला आणि मार्जिन १८% पर्यंत पोहोचला. मरीन सर्व्हिसेसचा महसूल १२५% वाढून ३६१ कोटी रुपये झाला, तर EBITDA १६७% वाढून २५९ कोटी रुपये झाला.