Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह 'या' शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला
मंगळवारी, भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात तेजी पाहायला मिळाली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,७०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स १७३.८१ अंकांनी म्हणजेच ०.२१% ने वाढून ८३,४५०.९६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४२.६५ अंकांनी म्हणजेच ०.१७% ने वाढून २५,७२५.४० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक २२४.९० अंकांनी किंवा ०.३७% ने वाढून ६१,१७४.०० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या गुंतवणूकदारांनी जर भारती एअरटेल, इटरनल, इन्फोसिस, भेल, अदानी एंटरप्रायझेस, दिलीप बिल्डकॉन, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, इंजिनियर्स इंडिया, एनडीएल व्हेंचर्स, हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेस या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत केले, तर त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता आहे.
आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी शिफासर केलेल्या या इंट्राडे स्टॉक्समध्ये सन टीव्ही, सफायर फूड्स इंडिया, बीपीसीएल, फोर्टिस हेल्थकेअर, प्रेस्टिज इस्टेट्स, टाटा मोटर्स पीव्ही, पेटीएम आणि डीसीएक्स सिस्टम्स यांचा समावेश आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि डेरिव्हेटिव्ह्ज आणि क्वांट रिसर्च प्रमुख जय ठक्कर यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी युनियन बँक फ्युचर्स, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस फ्युचर्स (एमएफएसएल) आणि कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) फ्युचर्स या स्टॉक्सची शिफारस केली आहे. नुवामा प्रोफेशनल क्लायंट्स ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष-संशोधन सागर दोशी यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी) आणि एनएलसी इंडिया लिमिटेड या तीन स्टॉकची शिफारस केली आहे.






